बसचा वापर फुगे विकण्यासाठी
फेरीवाल्याचा बंद पडलेल्या बसला फुगे लावून व्यवसाय. कल्याण :कल्याण डोंबिवली परिवाहनच्या मुख्य डेपोच्या बाहेर बंद पडलेल्या केडीएमटी बसचा आसरा घेत फेरीवाल्यांने व्यवसाय सुरू करत जणू काही 'फुग्यासह केडीएमटी बस विकणे आहे' असे केडीएमटी प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. यामुळे केडीएमटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. पालिका परिवहन विभागाच्या ताफ्यात 218 बसेस आहेत पैकी 81 बसेस रस्त्यावर धावत असून त्यातील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे केडीएमटी डबघाईला येत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे खासगी ठेकेदाराने काम करण्यास नकार दिल्याने कल्याण पश्चिम परिसरात खराब झालेल्या बसेस गणेश घाट डेपोच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असल्याने केडीएमटीला घरघर आल्याचे समोर आले आहे. कल्याण पश्चिममधील केडीएमटी गणेश घाट बाहेर बंद पडलेल्या बसेस उभ्या आहेत. त्याचा आसरा घेऊन फुगे विकत आहे. त्याने चक्क बंद पडलेल्या बसेसला फुगे लावले असून जणू काही केडीएमटी बस विक्री करणे आहे. असे चित्र समोर आल्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन होत असून केडीएमटी प्रशासन बसेस ची सुरक्षा प