आरक्षित भूखंड वाचविण्यासाठी वृक्ष लागवड करा पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश कल्याण - आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी एनजीओंनी पुढे यावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. आजच्या आढावा बैठकीत महापालिकेकडे असलेल्या आरक्षित भूखंडांची माहिती त्यांनी घेतली आणि सदर भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत सुचना अधिकारी वर्गाला देतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. महापालिकेने ताब्यात घेतलेले सुमारे 343 आरक्षित भूंखंड आहेत, महापालिकेच्या या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून भूखंडाच्या सभोवताली वृक्षारोपण करावे त्यासाठी इच्छुक एनजीओज(अशासकीय संस्था) यांची मदत घ्यावी, किंवा आरक्षित भूखंडाचा विकास होईपर्यंत मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन दयावेत आणि उत्तम खेडाळू घडविण्यासाठी या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांनी पुढे यावे, अधिक माहितीसाठी महापालिकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. तसेच महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित भूखंडांभोवती वाडेभिंती किंव