पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

इमेज
  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया स्थगित करा- माजी आमदार नरेंद्र पवार  भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप  कल्याण (प्रतिनिधी) :- ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँकेच्या भरतीमध्ये असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून सदर भरती प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे, याबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यात ही मागणी केली आहे.  दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने  दिनांक २६-०८-२२ रोजी उमेदवारांकडून  नवीन अर्ज मागितले होते. सदर पदभरती प्रक्रियेत अनेक युवकानी सहभाग घेतला आहे. दिनांक २४.०९.२२ रोजी परिक्षा प्रक्रिया झाली असून नुकताच निकाल व यादी जाहीर झाली असून या भरती प्रक्रियेत अनधिकृत रित्या आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाला आहे. भरती प्रक्रिया नियमानुसार न होणे,  मेरीट प्रमाणे भरती न होणे, व योग्य उमेदवाराची पदभरती न होणे या प्रकारामुळे भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ निदर्शनास आला असल्याचा आरोप नरेंद्र पवार यांनी केला आहे.  त्यामुळे सदर भरती प्रक्रियेवर स

काँग्रेस पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही

इमेज
  काँग्रेस पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे  मुंबई(प्रतिनिधी) :- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ते भंडारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, खा. सुनील मेंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, आ. परिणय फुके आणि प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे सहप्रमुख मा. विजय चौधरी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले तरी त्यांना रा