पुन्हा देवेंद्रजींबद्दल बोलाल तर भाजपा घराबाहेर पडू देणार नाही
विश्वासघाती उद्धव ठाकरेंना शेवटचा इशारा, पुन्हा देवेंद्रजींबद्दल बोलाल तर भाजपा घराबाहेर पडू देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा मुंबई(प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या बेईमान आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पूर्ण अपयशी होते. त्यांच्या मंत्र्याचे दाऊदबरोबर संबंध स्पष्ट झाले आणि त्याला तुरुंगात जावे लागले तरीही उद्धव ठाकरे त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढू शकले नाहीत. सत्तेसाठी त्यांनी लाळघोटेपणा केला. वाझेसारख्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही त्यांनी लाळघोटेपणा केला. अशा बेईमान, विश्वासघाती आणि घरकोंबड्या व्य