पाकमधील एका पित्याचे 100 मुलांचे स्वप्न - - वृत् क्वेट्टा- पाकिस्तानमधील एका 46 वर्षीय पित्याचे 100 मुलांचे स्वप्न आहे. सध्या तीन पत्नींपासून त्याला 35 मुले आहेत. आपण एक धार्मिक काम करत असल्याचे तो सांगतो. सरदार जन मोहम्मद खिल्जी (वय 46) असे त्या पित्याचे नाव आहे. खिल्जीचे स्वप्न साकार होण्यासाठी त्याच्या तीन पत्नींसह कुटुंबीय मदत करत आहे. कुटुंबीयांनी चौथ्या विवाहासाठी तयारी सुरू केली आहे. शंभर मुलांसह आम्ही पती-पत्नी आनंदात राहू, असे त्याच्या पत्नींनी सांगितले. ‘पाकिस्तानमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करण्यास परवानगी आहे. खिल्जीच्या पत्नींची काही तक्रार नसेल तर कोणी काही बोलू शकत नाही. यामुळे तो त्याचे 100 मुलांचे स्वप्न साकार करू शकतो,‘ असे माहिला अधिकार कार्यकर्त्या राफिया झकारिया यांनी सांगितले. ‘देशातील ही एक वेगळ्या प्रकारची घटना आहे. नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, खिल्जी याच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शंभर मुलांनी वाटून घ्यावी, एवढी त्याची संपत्तीही नाही. त्यामुळे हा गंभीर विषय वाटत आहे