फसवणूक करत वृद्धेची जमीन लाटली पोलिसांकडे न्यायाची मागणी
फसवणूक करत वृद्धेची जमीन लाटली पोलिसांकडे न्यायाची मागणी कल्याण (प्रतिनिधी ) : नवऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीतून वृद्धेला बेदखल करत जमीन हडपली .सदर बाब निदर्शनास येताच या महिलेने थेट प्रांताधीकाऱ्यांकडे दाद मागीतली असता प्रांताधिकार्यांनी या जमिनीच्या ७/१२ वर वृद्धेचे नाव लावण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अनुबाई तरे या महिलेने आपली फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस उपयुक्तांकडे केली आहे. अनुबाई तरे यांच्या पतीची कल्याण जवळील वडवली येथे वडिलोपार्जित जमीन होती. मात्र सुमारे 20 वर्षांपूर्वी तरे यांच्या पतीचे निधन झाले त्यानंतर 10 वर्षपूर्वी त्यांच्या सासर्याचे निधन झाले .तरे यांच्या कुटुंबीयांनी पतीच्या वडीलांच्या नावे असलेल्या या जमिनीचे वाटप झालेले नसल्याचा व अनुबाई तरे यांच्या अज्ञानाचा फायदा घेत इतर सह हिस्सेदारानि तरे यांना या जमिनीतून बेदखल केले त्यानंतर राहत्या घरातून देखील हाकलून दिले होते. यानंतर तरे यांना विश्वासात न घेता या जमीनिची एका नामांकित बिल्डरला परस्पर विक्री करत तरे यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्या