फसवणूक करत वृद्धेची जमीन लाटली पोलिसांकडे न्यायाची मागणी

फसवणूक करत वृद्धेची जमीन लाटली
पोलिसांकडे न्यायाची मागणी


         कल्याण (प्रतिनिधी ) : नवऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीतून वृद्धेला बेदखल करत जमीन हडपली .सदर बाब निदर्शनास येताच या महिलेने थेट प्रांताधीकाऱ्यांकडे दाद मागीतली असता प्रांताधिकार्यांनी या जमिनीच्या ७/१२ वर वृद्धेचे नाव लावण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अनुबाई तरे या महिलेने आपली फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस उपयुक्तांकडे  केली आहे.

        अनुबाई तरे यांच्या पतीची कल्याण जवळील वडवली येथे वडिलोपार्जित जमीन होती. मात्र सुमारे 20 वर्षांपूर्वी तरे यांच्या पतीचे निधन झाले त्यानंतर 10 वर्षपूर्वी त्यांच्या सासर्याचे निधन झाले .तरे यांच्या कुटुंबीयांनी पतीच्या वडीलांच्या नावे असलेल्या या जमिनीचे वाटप झालेले नसल्याचा व अनुबाई तरे यांच्या अज्ञानाचा  फायदा घेत इतर सह हिस्सेदारानि तरे यांना या जमिनीतून बेदखल केले त्यानंतर राहत्या घरातून देखील हाकलून दिले होते. यानंतर तरे यांना विश्वासात न घेता या जमीनिची एका नामांकित 
बिल्डरला परस्पर विक्री करत तरे यांची फसवणूक केली.

         आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी इतर हिस्सेदारांनी जाणीवपूर्वक  ७/१२ मधून आपले नाव न टाकल्याबाबत प्रांताधिकार्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर शहानिशा करत निर्णय देताना तत्कालीन प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी सर्व पुरावे तपासून घेत या जमिनीच्या ७/१२ वर अनुबाई तरे यांचे नाव टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महसूल विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे याचं दरम्यान आपल्या पती व सासर्याच्या मृत्यू नंतर  आपल्या अशिक्षितपणांचा व वृद्धत्वाचा फायदा घेत आपली फसवणूक करणाऱ्या या सह हिस्सेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याबाबत त्यांनी पोलीस उपयुक्तकडे तक्रार अर्ज सादर करून न्याय देण्याची विनंती केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत