महिलांंच्या बचत गट मेळाव्यात डिजिटल बॅॅकिंगचे मार्गदर्शन
महिलांंच्या बचत गट मेळाव्यात डिजिटल बॅॅकिंगचे मार्गदर्शन कल्याण ( प्रतीनिधी ) :- भाजप नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील एव्हरेस्ट सभागृहात महिला बचत गटासाठी २१ आणि २२ नोव्हेंबर असे दोन दिवस रोजगार मार्गदर्शन शिबीर सुरु झाले आहे.मेळाव्यात रोजगाराची माहिती मिळावी म्हणून महिलांनी गर्दी केली. या शिबिरात दोन दिवस उपस्थिती लावणाऱ्या महिलांना 400 रुपये उपस्थिती भत्ता देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले, यावेळी केंद्रीय कामगार शिक्षण बोर्डाचे कामगार अधिकारी अभिजित चावक, ग्राहक संरक्षण विभाग ( मुंबई ) प्रकल्प अधिकारी गजानन पाटील, शिक्षण अधिकारी एम.आर.जरिया,अनुलोमचे उपविभागप्रमुख संतोष साळुंखे आणि निवेदिता जोशी, नमिता कौर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेविका मनीषा धात्रक म्हणाल्या, प्रभागातील महिलांसाठी विविध संस्कृतीक उपक्रम आयोजित करत असतो.ज्यामुळे आमच्या प्रभागातील महिलांना लाभ व्हावा म्हणून सरकारच्या वतीने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना आल्या आहेत. याची प्रभागातील माहिती सामान्य महिलांना मिळावी य