डोंबिवलीतील भावे सभागृहाच्या नुतनीकरनाचा तिढा सुटेना


डोंबिवलीतील भावे सभागृहाच्या नुतनीकरनाचा तिढा  सुटेना


         कल्याण ( प्रतिनिधी ) :-  डोंबिवली पश्चिमेकडील  पु,भा.भावे सांस्कृतिक सभागृहाची उभारण्यात आलेली इमारत धोकादायक झाली आहे. गेली अनेक वर्षा पासून इमारतीच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी भाजपाचे स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या सह सर्वच राजकिय पक्षानी पालीका प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला होता. पालिका प्रशासनाकडून या इमारतीच्या नुतनिकरनासाठी दरवषी पालिकेच्या अर्थसंकल्पात लाखो रुपयाची कागदो पत्री तरतूद केली जाते  मात्र सदर वास्तूची जागा कलेक्टर लेन्ड असल्याने या इमारतीच्या जागेचा भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव  जिल्हाधिकारी कार्यालयात गेली अनेक महिने धुळ खात पडून आहे .त्यामुळे पु,भा भावे सांस्कृतिक भवन इमारतीच्या नुतनीकरनाला तिढा सुटणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे .
       
  डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड येथील साहित्यिक पु.भा.भावे सभागृह यांच्या नावाने पु,भा.भावे सांस्कृतिक सभागृहाची इमारत उभारण्यात आली .या दोन मजली इमारतीत तळमजल्यावर सभागृह असून त्या ठिकाणी निवडणूक विभागाचे कार्यालय आहे .पहिल्या माळ्यावर तलाठी कार्यालय असून या तलाठी कार्यालयात ऑनलाईन सेतू सेवा उपकेंद्र सुरुकेले असल्याने तलाठी कार्यालया संबधित व सेतू सेवा उपकेंद्रात विविध दाखल्यासाठी व कामकाजासाठी नागरिकांची वर्दळ असते. व आजही हि कार्यालये सुरु असून येथे आपल्या काम काजा साठी येणारे नागरिक आपले जीव मुठीत घेऊन येत असतात  दुसर्या मजल्यावर पालिकेची हिंदी माध्यमाची प्राथमिक शाळा असून पहिले ते चौथी इयत्ती पर्यंत शाळा  भरात होती मात्र हि इमारत धोकादायक बनली असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहचू नये म्हणून गेल्या वर्षा पासून या इमारतीतील पालिकेची शाळा अन्य ठिकाणी स्थलांतरित केली आहे . 
           
  महापालिका प्रशासनाने अनेक वर्षा पूर्वीच हि इमारत धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या वेळखाऊ पणामुळे या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पालिका प्रशासना कडून कोणतेच ठोस पावले उचलली जात नसल्याने सदरची इमारत अद्यापही मरणासन्न अवस्थेत अखेरची घटका मोजीत आहे.हि धोकादायक इमारत पाडून या इमारतीच्या जागी नव्याने संस्कृतीक सभागृहाची इमारत उभारावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षा पासून पालिका प्रशासनाकडे स्थानिका नगरसेवक शेलेश धात्रक यांनी पालिका दरबारी केली होती .पालिका प्रशासनाने हि या धोकादायक सभागृहाची इमारत पाडून त्या जागी या बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी पालिकेच्या अर्थ संकल्पीय अंदाज पत्रकात दर वर्षी कोट्यावधी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे . मात्र या सभागृहाच्या इमारतीचा भूखंड पालिका प्रशासनाच्या ताब्यात नसून शासनाच्या जिल्हाधिकारी विभागाच्या मालकीचा आहे .
         
   सदरचा भूखंड  पालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारीकार्यालयाकडे पाठविला आहे .पु.भा.भावे सांस्कृतिक केंद्र सभागृहाच्या जमिनीचा भूखंड पालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी स्थानिका नगरसेवक धात्रक यांनी ठाणे जिल्हादिकारी कार्यालयात पाठपुरावा करून गेल्या अनेक महिन्या पासून सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणतीच हालचाली होत नसल्याने या इमारतीच्या हस्तांतरित करण्याचा तिढा सुटता सुटत नसल्याचे सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात बसला असून शासनाच्या लालफितीत अडकून पडला असल्याने थोर साहित्यिकाच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी शासनाच्या अनास्थे बाबत भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी खंत व्यक्त केली आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत