पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हाय

  हाय 

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीना 1 लाखाचा दंड

  मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीना 1 लाखाचा दंड   कल्याण( प्रतिनिधी ):- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न सातत्याने करीत आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून , महापालिकेच्या सर्व प्रभाग परिसरात, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वा कापड परिधान न करणा-या व्यक्तीविरुद्ध दंडाची कारवाई देखील दररोज सुरु ठेवली आहे. असे असतांनाही घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अनेक नागरिक विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन विना मास्क फिरणा-या नागरिकांविरुध्द सक्त दंडात्मक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्त यांना दिले आहेत, यामध्ये केवळ नागरिकांकडून दंड वसूली हा हेतू नसून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन त्यांनी खबरदारी घ्यावी, हाच हेतू आहे. महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार काल दि. 29/09/2021 दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी मास्क वा कापड परिधान न केलेल्या 218 व्यक्तींना एकूण रुपये 1,09,000/- इतका दंड आकारण्यात आला आहे.  तरी महापालिका क्षेञातील कोरो

शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले!

  शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले! भाजपचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांचा आरोप      कल्याण ( प्रतिनिधी) शाळाप्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे  कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.   राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणाऱ्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही, असा आरोपही शशिकांत कांबळे यांनी केला.
 naaaaa

नमस्कार

  सर्वांना नमस्कार

हेमलता नरेंद्र पवार आयोजित मोफत लसीकरण

इमेज
  हेमलता नरेंद्र पवार आयोजित मोफत लसीकरण     ६१० नागरिकांना दिली लस कल्याण (प्रतिनिधी) कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या मोफत लसीकरणाला कल्याण मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ६१० नागरिकांचे लसीकरण झाले आज कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कल्याणमधील पारनाका विभागातील अभिनव विद्यामंदिर मधील डॉ आनंदीबाई जोशी सभागृहात मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षांवरील युवक व नागरिकांसाठी पहिला डोस व ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देण्यात आला. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे ६१० युवक व नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरण शिबिरात हेमा नरेंद्र पवार यांनी सूक्ष्म नियोजन केल्याने नागरिकांची काळजी घेतली जात होती. याकामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक डॉ विनोद दौंड तसेच समन्वयक डॉ कुणाल सर्वगौड व डॉ शशिकला यादव यांच्या संपूर्ण टीमने  मोलाचे सहकार्य केल

आरक्षित भूखंड वाचविण्यासाठी वृक्ष लागवड करा

आरक्षित भूखंड वाचविण्यासाठी वृक्ष लागवड करा   पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश          कल्याण - आरक्षित भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यासाठी एनजीओंनी पुढे यावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. आजच्या आढावा बैठकीत महापालिकेकडे असलेल्या आरक्षित भूखंडांची माहिती त्यांनी घेतली आणि सदर भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत सुचना अधिकारी वर्गाला देतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. महापालिकेने ताब्यात घेतलेले सुमारे 343 आरक्षित भूंखंड आहेत, महापालिकेच्या या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून भूखंडाच्या सभोवताली वृक्षारोपण करावे त्यासाठी इच्छुक एनजीओज(अशासकीय संस्था) यांची मदत घ्यावी, किंवा आरक्षित भूखंडाचा विकास होईपर्यंत मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन दयावेत आणि उत्तम खेडाळू घडविण्यासाठी या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांनी पुढे यावे, अधिक माहितीसाठी महापालिकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. तसेच महापालिकेच्या ताब्‍यातील आरक्षित भूखंडांभोवती वाडेभिंती किंव