मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीना 1 लाखाचा दंड

 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीना 1 लाखाचा दंड 

 कल्याण( प्रतिनिधी ):- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न सातत्याने करीत आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून , महापालिकेच्या सर्व प्रभाग परिसरात, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वा कापड परिधान न करणा-या व्यक्तीविरुद्ध दंडाची कारवाई देखील दररोज सुरु ठेवली आहे. असे असतांनाही घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अनेक नागरिक विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन विना मास्क फिरणा-या नागरिकांविरुध्द सक्त दंडात्मक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्त यांना दिले आहेत, यामध्ये केवळ नागरिकांकडून दंड वसूली हा हेतू नसून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन त्यांनी खबरदारी घ्यावी, हाच हेतू आहे.


महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार काल दि. 29/09/2021 दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी मास्क वा कापड परिधान न केलेल्या 218 व्यक्तींना एकूण रुपये 1,09,000/- इतका दंड आकारण्यात आला आहे.


 तरी महापालिका क्षेञातील कोरोनाची साथ नियंञणात ठेवण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करून कोरोना विरुध्दच्या लढयात महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापलिकेमार्फत करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत