पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीना 1 लाखाचा दंड

  मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीना 1 लाखाचा दंड   कल्याण( प्रतिनिधी ):- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न सातत्याने करीत आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून , महापालिकेच्या सर्व प्रभाग परिसरात, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वा कापड परिधान न करणा-या व्यक्तीविरुद्ध दंडाची कारवाई देखील दररोज सुरु ठेवली आहे. असे असतांनाही घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अनेक नागरिक विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन विना मास्क फिरणा-या नागरिकांविरुध्द सक्त दंडात्मक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्त यांना दिले आहेत, यामध्ये केवळ नागरिकांकडून दंड वसूली हा हेतू नसून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊन त्यांनी खबरदारी घ्यावी, हाच हेतू आहे. महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार काल दि. 29/09/2021 दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी मास्क वा कापड परिधान न केलेल्या 218 व्यक्तींना एकूण रुपये 1,09,000/- इतका दंड आकारण्यात आला आहे.  तरी महापालिका क्षेञातील कोरो

शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले!

  शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले! भाजपचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांचा आरोप      कल्याण ( प्रतिनिधी) शाळाप्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे  कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.   राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणाऱ्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही, असा आरोपही शशिकांत कांबळे यांनी केला.