पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

इमेज
 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील.  मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत

इमेज
  प्रगतीचे प्रतिबिंब उमटविणारा विकसित भारत संकल्पाचा परिपूर्ण आराखडा! केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत           कल्याण ( प्रतिनि धी ) :- ‘येत्या पंचवीस वर्षांत विकसित भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी पथदर्शी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प, अशा शब्दात केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. विकासाच्या दिशेने वेगाने मार्गाक्रमणाची हमी देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून देशातील शेतकरी, गरीब, महिला शक्ती आणि युवाशक्तीच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले आहे, अशा शब्दांत भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.              महिला युवक, गरीब आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी समर्पित असलेल्या या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशाचे भवितव्य घडविणाऱ्या या चार वर्गांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत, असेही सुर्यवंशी यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.           एक कोटी घऱांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवून गोरगरीबांची घरे उजळ