एनआरसी कंपनीच्या कामगारांची 841 कोटीची थकीत देणी लवकरच मिळणार - आमदार नरेंद्र पवार
एनआरसी कंपनीच्या कामगारांची 841 कोटीची थकीत देणी लवकरच मिळणार - आमदार नरेंद्र पवार कल्याण (संतोष होळकर) : एकेकाळी महाराष्ट्रातील रेयॉन धागा उत्पादन करणारी आंबिवली येथील सर्वात मोठी एनआरसी कंपनीकडे असलेली कामगारांची 841 कोटीची देणी मिळावी व कामगारांना न्याय मिळावा या संदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकारातून कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्या दालनात बैठक पार पडली. आंबिवली येथील कंपनी २००९ साली बेकायदेशीरपणे बंद करण्यात आली मात्र त्याठिकाणी असणाऱ्या साडेचार हजार कामगारांची पगार आणि देणी न देता हा निर्णय घेतल्याने कामगारांवर प्रचंड अन्याय झाला आहे. कंपनी टाळेबंद होऊन तब्बल नऊ वर्षे झाली आहेत. कामगारांना न्याय देण्यासाठी तातडीने शासनाने यावर कार्यवाही करावी आणि सर्व देणी द्यावी अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी बैठकीत बोलताना केली. आंबिवली येथील एनआरसी कंपनी २००९ साली बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमधील साडेचार हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पगार न देता कंपनी बंद करण्यात आली आहे. त