कचऱ्यापासून खत प्रकल्पाचे उदघाटन

कचऱ्यापासून खत प्रकल्पाचे उदघाटन 

 

कल्याण (संतोष होळकर): केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे, त्या नुसार कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था यांनी कल्याण मधील 'ड' प्रभाग कार्यालयात ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन कल्याण पूर्व पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात शून्य कचरा अभियानाअंतर्गत बायो कल्चर युनिट सेंद्रीय खत प्रकल्पाचे उदघाटन पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर, प्रभाग समिती सभापती हेमलता पावशे, नगरसेवक राजाराम पावशे, नगरसेविका शितल मंढारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के, प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, उपअभियंता वैद्य, पाणी पुरवठा विभाग उपअभियंता अशोक घोडे, सहयोग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले, पर्यावरण तज्ज्ञ विनोद दळवी, दिपक लिंगम, आरोग्य निरीक्षक एल. के. पाटील, ठेकेदार संघटना अध्यक्ष बंटी तरे सहित ड प्रभाग क्षेत्र कार्यालयामधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्यासाठी 8 महिन्यापूर्वी मी स्वतः घरातुन सुरुवात केली. सुरवातीला 15 दिवस माहिती नसल्याने थोडा गोंधळ उडाला मात्र त्यातील जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊन कचऱ्यावरील प्रक्रीया स्वतः केली त्यामुळे आता कचऱ्याचा वास ही येत नसून चांगल्या दर्जाचे खत माझ्या घरातील झाडासाठी वापरत आहे असे सांगत तोरस्कर पुढे म्हणाले की कल्याण पूर्व मध्ये हा प्रकल्प एकाच ठिकाणी न होता पूर्ण पालिका हद्दीत व्हावे व प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात अश्या प्रकारे कचऱ्यापासून खत निर्माण केल्यास शहरातील कचऱ्याची मोठी समस्या दूर होण्यास मदत होईल व आपले शहर कचरा मुक्त शहर होईल अशी आशा व्यक्त केली, यासाठी पालिकेमार्फत सामाजिक संस्थांना नेहमीच मदत मिळेल असे आश्वासन यावेळी उपायुक्त तोरस्कर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत