पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाच म्हणून शरीर सुखाची मागणी

लाच म्हणून शरीर सुखाची मागणी          कल्याण( प्रतिनिधी ) :- कल्याण डोंबिवली महापालिका लाच प्रकरणासाठी प्रसिद्ध आहे,  दोन तीन महिन्यात एखादातारी लाच प्रकरणात अडकत असून आज मात्र लाच म्हणून चक्क शरीर सुखाची मागणी एक लिपिकाने महिले कडे केल्याने महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे,            कल्याण पश्चिमेतील 30 वर्षीय एक महिलेच्या राहत्या घराचे मालमत्ता कर थकबाकीची नोटीस मालमत्ता विभागाचा लिपिक रमेश राजपूत याने काढली होती, या नोटीस बाबत सदर महिला राजपूत यांना भेटून कर भरण्यासाठी मुदत वाढवूनद्या व कराची रक्कम कमी करा अशी विनंती केली मात्र या साठी लाच म्हणून राजपूत याने तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने तक्रारदार महिलेने लाच लुचपत विभागाकडे धाव घेतल्याने आज लाचलुचपत विभागाने रमेश राजपूत या कर लिपीकला अटक केली,

अटाळी येथील गजानन पाटील विधालाय बनले कनिष्ठ महाविद्यालय

इमेज
अटाळी येथील गजानन पाटील विधालाय बनले कनिष्ठ महाविद्यालय कल्याण (संतोष होळकर ):- कल्याण जवळील अटाळी गावातील प्रतिष्ठित गजानन हिरू पाटील विद्यालयाल सण 2019/20 पासून कनिष्ठ महाविद्यालयाची परवानगी मिळाल्याने परिसरातील गरीब गरजू विध्यार्थी व पालकांना 11 वी प्रवेशासाठी होणारा त्रास कमी झाला असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी काढले, कल्याण शहरात मोठ्याप्रमाणावर महाविद्यालय असून अटाळी मोहने टिटवाळा परिसरात महाविद्यालय नसल्याने या परिसरातील 10वी पास होणाऱ्या विद्यार्थाना 11वी प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागत होती परिणामी मोठया प्रमाणावर डोनेशन द्यावे लागत होते, या परिसरातील पालक वर्ग मध्यम वर्गीय असून त्यांना विद्यार्थ्यांसाठी जास्तीचा खर्च परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत होते, या साठी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा विचार मनात आला असल्याचे मनोगत मुख्याध्यापक गणेश पाटील सर यांनी आपल्या प्रस्थाविकात केले, गजानन पाटील विध्यालायची स्थापना सण 1995 साली झाली यावर्षी एक खोलीत 1ली चा वर्ग सुरू करून सण 2003 मध्ये माध्यमिक