लाच म्हणून शरीर सुखाची मागणी

लाच म्हणून शरीर सुखाची मागणी


         कल्याण( प्रतिनिधी ) :- कल्याण डोंबिवली महापालिका लाच प्रकरणासाठी प्रसिद्ध आहे,  दोन तीन महिन्यात एखादातारी लाच प्रकरणात अडकत असून आज मात्र लाच म्हणून चक्क शरीर सुखाची मागणी एक लिपिकाने महिले कडे केल्याने महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे,

           कल्याण पश्चिमेतील 30 वर्षीय एक महिलेच्या राहत्या घराचे मालमत्ता कर थकबाकीची नोटीस मालमत्ता विभागाचा लिपिक रमेश राजपूत याने काढली होती, या नोटीस बाबत सदर महिला राजपूत यांना भेटून कर भरण्यासाठी मुदत वाढवूनद्या व कराची रक्कम कमी करा अशी विनंती केली मात्र या साठी लाच म्हणून राजपूत याने तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने तक्रारदार महिलेने लाच लुचपत विभागाकडे धाव घेतल्याने आज लाचलुचपत विभागाने रमेश राजपूत या कर लिपीकला अटक केली,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत