अटाळी येथील गजानन पाटील विधालाय बनले कनिष्ठ महाविद्यालय
अटाळी येथील गजानन पाटील विधालाय बनले कनिष्ठ महाविद्यालय
कल्याण (संतोष होळकर ):- कल्याण जवळील अटाळी गावातील प्रतिष्ठित गजानन हिरू पाटील विद्यालयाल सण 2019/20 पासून कनिष्ठ महाविद्यालयाची परवानगी मिळाल्याने परिसरातील गरीब गरजू विध्यार्थी व पालकांना 11 वी प्रवेशासाठी होणारा त्रास कमी झाला असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी काढले,
कल्याण शहरात मोठ्याप्रमाणावर महाविद्यालय असून अटाळी मोहने टिटवाळा परिसरात महाविद्यालय नसल्याने या परिसरातील 10वी पास होणाऱ्या विद्यार्थाना 11वी प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागत होती परिणामी मोठया प्रमाणावर डोनेशन द्यावे लागत होते, या परिसरातील पालक वर्ग मध्यम वर्गीय असून त्यांना विद्यार्थ्यांसाठी जास्तीचा खर्च परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत होते, या साठी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा विचार मनात आला असल्याचे मनोगत मुख्याध्यापक गणेश पाटील सर यांनी आपल्या प्रस्थाविकात केले,
गजानन पाटील विध्यालायची स्थापना सण 1995 साली झाली यावर्षी एक खोलीत 1ली चा वर्ग सुरू करून सण 2003 मध्ये माध्यमिक विभाग सुरू केला 25 खोल्यांच्या या विद्यालयाचा 2018 रोजी 10वी चा निकाल 95% लागला असून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये प्रोजेक्टर लावण्यात आले असून डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असल्याची माहितीही गणेश पाटील यांनी दिली,
गजानन हिरू पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांच्या सह कोळी समाजाचे नेते व विधानपरिषद आमदार रमेश पाटील, माजी आमदार व कोळी समाज नेते कांती कोळी, नाशिक येथील डॉ,ज्ञानेशनंद शात्री महाराज, नगरसेवक गोरख जाधव, संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, संचालक जनार्धन पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक एक सारखे कपडे घालून व कोट घालून उपस्थित राहिल्याने कार्यक्रमात वेगळेपण दिसून येत होते, उडघटनाचा कार्यक्रम चांगला होण्यामागे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मिनल पाटील व सर्व शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मेहनत असल्याचे संस्था अध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा