पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी, सामान्य जनतेला दिलासा,

इमेज
  पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी, सामान्य जनतेला दिलासा, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,   कल्याण ( प्रतिनिधी):- पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले आहे.          एका प्रसिद्धी पत्रकात शशिकांत कांबळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी!

  पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी! भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची केंद्र सरकारकडे मागणी           कल्याण ( प्रतिनिधी):- काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. अन्सारी यांच्यावरील वादग्रस्त आरोपांवर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे ते म्हणाले.           सन २००७ ते २०१७ या काळात हमीद अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती होते. याच काळात त्यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार या नात्याने दौरे करताना भारतातील महत्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळविल्याचा गंभीर गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे. एकदा दोनदा नव्

स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

इमेज
  स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा            कल्याण (प्रतिनिधी):- येथील स्वामी समर्थ मठात सकाळी काकड आरतीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर संपूर्ण मठात रांगोळी काढली व स्वामी पूजना नंतर आरती होमहवन होऊन भंडारा सुरू करण्यात आला यावेळी सुमारे 10 ते 12 हजार भाविकांनी दर्शन व भांडाऱ्याचा लाभ घेतला, यावेळी अनेक मान्यवर पाहुण्यांचा सन्मान गुरुवर्य नवनीतानंद महाराज यांनी केला,            कल्याण मधील बिर्ला कॉलेज जवळील सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण, संचालित स्वामी समर्थ मठ हे एक जागृत देवस्थान आहे,  गुरुवर्य नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज) यांनी बिर्ला कॉलेज जवळील फॉरेस्ट कॉलनी मध्ये स्वामी समर्थ मठाची स्थापना केली, नवनीतानंद महाराजाच्या  प्रदीर्घ साधना व पूजा अर्चना मुळे स्वामी समर्थ मठ हे जागृत देवस्थान बनवले आहे,          स्वामी समर्थ मठात भाविकांना स्वामी समर्थ सोबतच साईबाबा, गजानन महाराज, कोकणातील जागृत मोराई देवी, शंकर महाराज, दत्तगुरु, गणपती गजानन, शिव शंकर, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, संतोषी माता, दक्षिणमुखी मारुती, पिंपलेश्वर, आदी देव

स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या नावाने सोलापुरात क्लिनिकचे उद्घाटन

इमेज
 स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या नावाने सोलापुरात क्लिनिकचे उद्घाटन स्व. मातोश्रीच्या नावाने क्लिनिकच्या रूपाने सेवाकार्य सुरू झाल्याचा आनंद - माजी आमदार नरेंद्र पवार         कल्याण ( प्रतिनिधी) :- संत कैकाडी महाराज विमुक्त भटक्या जाती जमाती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मातोश्री स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या स्मरणार्थ सोलापूर येथील सेटलमेंट कॉलनी येथे स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.           खरंतर माझ्या स्व. आईच्या स्मरणार्थ एखादे सेवाकार्य सुरू होणं आणि तेही रुग्णसेवेच्या माध्यमातून होणं हे अत्यंत आनंददायी आहे. आई गेल्यानंतर मोठं दुःख झालं, कारण माझ्या आजच्या जडणघडणी आणि वाटचालीमध्ये समाज आणि इतर सर्व घटकांपेक्षा मोठा वाटा माझ्या आईचा आहे. कारण आईनेच मला समाजातल्या चांगल्या गोष्टीपर्यंत पोहचवले. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे क्लिनिक सोलापूरमध्ये छोट्या स्वरूपात जरी सुरू झाले असले तरी येणाऱ्या काळात सोलापूरातील सर्व घटकांना नाममात्र दरात दर्जेदार उपचार मिळती

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

इमेज
  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कल्याण, दि. ११ (प्रतिनिधी) :  नियोजित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आज दिले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये श्री. कपिल पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईत आज भेट घेतली. तसेच नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी देण्याची विन