स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या नावाने सोलापुरात क्लिनिकचे उद्घाटन
स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या नावाने सोलापुरात क्लिनिकचे उद्घाटन
स्व. मातोश्रीच्या नावाने क्लिनिकच्या रूपाने सेवाकार्य सुरू झाल्याचा आनंद - माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण ( प्रतिनिधी) :- संत कैकाडी महाराज विमुक्त भटक्या जाती जमाती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मातोश्री स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार यांच्या स्मरणार्थ सोलापूर येथील सेटलमेंट कॉलनी येथे स्व. शकुंतलाबाई बाबुराव पवार क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
खरंतर माझ्या स्व. आईच्या स्मरणार्थ एखादे सेवाकार्य सुरू होणं आणि तेही रुग्णसेवेच्या माध्यमातून होणं हे अत्यंत आनंददायी आहे. आई गेल्यानंतर मोठं दुःख झालं, कारण माझ्या आजच्या जडणघडणी आणि वाटचालीमध्ये समाज आणि इतर सर्व घटकांपेक्षा मोठा वाटा माझ्या आईचा आहे. कारण आईनेच मला समाजातल्या चांगल्या गोष्टीपर्यंत पोहचवले. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे क्लिनिक सोलापूरमध्ये छोट्या स्वरूपात जरी सुरू झाले असले तरी येणाऱ्या काळात सोलापूरातील सर्व घटकांना नाममात्र दरात दर्जेदार उपचार मिळतील असे नामवंत रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे. चांगल्या नामवंत डॉक्टरांच्या शिबिराचे आयोजन दर महिन्याला करण्याचा मानस आहे. एवढेच नाही तर राज्यभरात शक्य होईल त्या ठिकाणी सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी याचा विस्तार करण्याचा देखील मानस आहे, समाजाचे आपण देणे लागतो मात्र ते देणे जर सेवेच्या माध्यमातून दिले तर समाजाला फायदा होईल हा विचार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केला आणि हे कार्य सुरू झाले असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.
दरम्यान यावेळी नागरिकांना मोफत उपचाराचे कार्डही वाटप करण्यात आले.
यावेळी सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, राष्ट्रवादीचे सोलापूर शहराध्यक्ष श्री. भारत जाधव, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे युवा प्रदेश संयोजक श्री. अमोल गायकवाड, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शिवाजी आव्हाड, अशोक वणवे, विष्णू सांगळे, संस्थेचे अध्यक्ष एस.एल. गायकवाड, नारायण गायकवाड, भाजयुमो सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आदी पदाधिकारी, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा