स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
कल्याण (प्रतिनिधी):- येथील स्वामी समर्थ मठात सकाळी काकड आरतीने गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर संपूर्ण मठात रांगोळी काढली व स्वामी पूजना नंतर आरती होमहवन होऊन भंडारा सुरू करण्यात आला यावेळी सुमारे 10 ते 12 हजार भाविकांनी दर्शन व भांडाऱ्याचा लाभ घेतला, यावेळी अनेक मान्यवर पाहुण्यांचा सन्मान गुरुवर्य नवनीतानंद महाराज यांनी केला,
कल्याण मधील बिर्ला कॉलेज जवळील सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण, संचालित स्वामी समर्थ मठ हे एक जागृत देवस्थान आहे, गुरुवर्य नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज) यांनी बिर्ला कॉलेज जवळील फॉरेस्ट कॉलनी मध्ये स्वामी समर्थ मठाची स्थापना केली, नवनीतानंद महाराजाच्या प्रदीर्घ साधना व पूजा अर्चना मुळे स्वामी समर्थ मठ हे जागृत देवस्थान बनवले आहे,
स्वामी समर्थ मठात भाविकांना स्वामी समर्थ सोबतच साईबाबा, गजानन महाराज, कोकणातील जागृत मोराई देवी, शंकर महाराज, दत्तगुरु, गणपती गजानन, शिव शंकर, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, संतोषी माता, दक्षिणमुखी मारुती, पिंपलेश्वर, आदी देवाचं दर्शन मिळते, जागृत अश्या या पवित्र मठात गुरुपौर्णिमा उत्सव होत आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा