नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक
धक्कादायक घटना
नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक
डोंबिवली :- दि. १२ ( प्रतिनिधी ) डोंबिवलीत १२ मार्च रोजी सकाळी
पूर्वेकडील फतेह अली रोडला असलेल्या एका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून
नवजात बालिकेला फेकून तिचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी
रामनगर पोलिसांनी तब्बल एका महिन्यांनी मुलीच्या आईला अटक केली आहे.
दुसरी मुलगी झाली म्हणून घरी जाच होत असल्याने तिने ५ दिवसांच्या
मुलीलाएका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची कबुली दिली
असल्याची माहिती वपोनी सुनील शिवलकर यांनी सांगितले. सुजाता दत्ता
गायकवाड ( २४ ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे .
डोंबिवली पूर्वेत महापालीकेच्या कार्यालयासमोरील फतेह अली रोडला
शुभदा नर्सिंग होम नामक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये अंबरनाथ
तालुक्याच्या नाऱ्हेण गावात राहणारी सुजाता दत्ता गायकवाड ( २४ ) या
महिलेने रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सिझेरियन प्रसूती नंतर
मुलीस जन्म दिला. तेव्हा पासून हि महिला आपल्या मुलीसह हॉस्पिटल मध्ये
होती. गुरुवारी सकाळी अंघोळ घालून पाळण्यात ठेवलेली मुलगी अचानक बेपत्ता
झाल्याने हॉस्पिटल मध्ये शोधा-शोध सुरु झाली. मात्र मुलगी कुठेच आढळून
आली नाही. त्य च वॉरड मध्ये अन्य चार महिला पेशंटच्या नातेवाईकांना हि
मुलगी हॉस्पिटलच्या इमारती खालच्या आवारात पडलेली आढळून आली.
हॉस्पिटलच्या डॉक्टर हर्षदा प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासले असता
हि मुलगी मृत असल्याचे समजले. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून
डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्या मुलीचा मृत्यू झालाहोता.. स्थानिक
रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदानासाठी
पालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल कडे पाठविला होते . या घटना डोंबिवली
सारख्या सुशिक्षित नगरीत घडल्यामुळे प्रचंड खळबळ माजली होती. या घटनेने
नंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा