मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी
मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी कल्याण : कल्याण जवळ असलेल्या मोहने येथील पंप हाऊस च्या जागेवर बगीचा व अवकाश केंद्र उभारावे अशी मागणी अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी नगरसेवक निधी देण्याची तयारी दाखवून उर्वरित निधी पालिका प्रशासनाने तरतूद करत नागरिकासाठी मनोरंजण व शैक्षणिक केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन पत्र कोट यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. महापालिकेचे मोहने पंप हाऊस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने या ठिकाणी मोकळ्या होणाऱ्या जागेवर नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी,खगोलप्रेमींसाठी, पक्षी निरीक्षक प्रेमींसाठी अद्यावत बगीचा व अवकाश दर्शन दुर्बीण,महापालिका प्रोजेक्ट मॉडेलचे दर्शन, उल्हासनदी किनारी उतरण्यासाठी घाट आदी सुविधा करत शैक्षणिक व मनोरंजन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मनसेच्या अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी प्रशासनाला सादर केला आहे. तसेच या कामासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपये देण्याची तयारी कोट यांनी दर्शवत अतिरिक्त निधीची तरतूद प्रशासनाने करून सदर मनोरंजन व