मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी



मोहने येथे बगीचा आणि अवकाश केंद्राची मागणी





         कल्याण : कल्याण जवळ असलेल्या मोहने येथील  पंप हाऊस च्या जागेवर बगीचा व अवकाश केंद्र उभारावे अशी मागणी अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी नगरसेवक निधी देण्याची तयारी दाखवून उर्वरित निधी पालिका प्रशासनाने तरतूद करत नागरिकासाठी मनोरंजण व शैक्षणिक केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन पत्र कोट यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

        महापालिकेचे मोहने पंप हाऊस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने या ठिकाणी मोकळ्या होणाऱ्या जागेवर नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी,खगोलप्रेमींसाठी, पक्षी निरीक्षक प्रेमींसाठी अद्यावत बगीचा व अवकाश दर्शन दुर्बीण,महापालिका प्रोजेक्ट मॉडेलचे दर्शन, उल्हासनदी किनारी उतरण्यासाठी घाट आदी सुविधा करत शैक्षणिक व मनोरंजन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव  मनसेच्या अ प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट यांनी प्रशासनाला सादर केला आहे. तसेच या कामासाठी नगरसेवक निधीतून पाच लाख रुपये देण्याची तयारी कोट यांनी दर्शवत अतिरिक्त निधीची तरतूद प्रशासनाने करून सदर मनोरंजन व शैक्षणिक केंद्राची सुविधा सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. या जागेवर अवकाश दुर्बीण उपलब्ध करून दिल्यास कर्जत कसारा पासुन ठाणे पर्यंत खगोलप्रेमींना,विद्यार्थ्यांना, नागरिकांना मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही तसेच या माध्यमातून पालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत