उभार्णी ते श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती पायी दिंडीचे टिटवाळ्यात स्वागत
कल्याण : श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून पंचक्रोशितील बल्याणी, उंभार्णी ग्रामस्थाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र टिटवाळा महागणपती पायी दिंडी सोहळा संपन्न झाला.टिटवाळ्या मध्ये या पायी दिंडीचे स्वागत स्थायी समिती सदस्य नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर यांनी केले. याप्रसंगी दिंडीतील वारकरी व भाविकांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले. समाजसेवक शक्तीवान भोईर आणि स्थायी समिती सदस्य उपेक्षा भोईर यांनी पायी चालत या दिंडीत सहभाग घेतला. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोईर, यामिनी चव्हाण, कल्पना रोंबेकर, राजश्री चव्हाण, प्रभा नरसिहन, साई भोईर, विनोद, किरण, नेहा चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा