डोंबिवली स्टेशन जवळून केडीएमटी बससेवा सुरु
डोंबिवली स्टेशन जवळून केडीएमटी बससेवा सुरु
कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकपरिसरमधून केडीएमटी बस सोडून केडीएमटी परिवहन समिती सदश्यांनी अनोखी भेट दिली. मंगळवार सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला, यावेळी परिवहन विभागाला चांगले दिवस यावे यासाठी सभापती संजय पावशे यांनी साकडे घातले यावेळी उपस्थितांनी होय महाराजा म्हणत साथ दिली.डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर मधून केडीएमटी बसेस सोडाव्या अशी मागणी होती त्याला अखेर आज मुहूर्त मिळाला. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते लोढा हेवन व्हाया निळजे रेल्वे स्थानक, दुपार सत्र डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते मानपाड़ा, पी एंड टी कॉलनी, ग्रोगासवाडी या बसेस पूर्वी बाजी प्रभु चौकातुन सूटत असत.
सभापती संजय पावशे, स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेता मंदार हळबे, महाव्यस्थापक देवीदास टेकाळे, वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोंविद गंभीरे, प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, अमित पंडित, परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, सुभाष म्हस्के, प्रल्हाद म्हात्रे, मनोज चौधरी, संजय राणे, मधुकर यशवंतराव, प्रसाद माळी, परिवहन विभाग अधिकारी श्याम पष्ते, संदीप भोसले, प्रवासी संघटना पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला.
यावेळी पूजा करताना सभापती संजय पावशे यांनी मालवणी पध्दतीने गणपती बाप्पाला साकडे घातले. परिवहन विभागाची इड़ा पीड़ा जावू दे, प्रशासन अधिकारी वर्गाला सुबुद्धि येवू दे, उपन्न वाढू दे असे साकडे घातले. तर उपस्थित मान्यवरांनी होय महाराजा बोलत साद दिली. यावेळी गणपती बाप्पा मोरया घोषणा ही देण्यात आल्या. यावेळी परिवहन समिती सभापती, अधिकारी, परिवहन समिती सदस्य, विरोधी पक्ष नेता, प्रवासी संघटना पदाधिकारी वर्गाने स्टेशन परिसरामध्ये बसने प्रवास केला. यावेळी बसने प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सभापती संजय पावशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रेल्वे स्थानक परिसर मध्ये बस सुविधा सुरु होणार म्हणून पालिकेने तेथील फेरीवाल्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. मात्र ही बससेवा सुरु ठेवण्यासाठी त्या परिसरमध्ये नो पार्किंगमध्ये उभे असलेल्या दुचाकी, फेरिवाल्यावर कारवाई करण्याच्या मागणीला जोर धरु लागला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा