फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही करतात कारवाई
फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही करतात कारवाई भाऊ पाटील यांचा आरोप डोंबिवली :- मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर पालिका प्रशासनाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र फेरीवाला संघटनेने यावर आपली भूमिका मांडण्यासाठी मंगळवारी डोंबिवलीत घेतलेल्या भव्य मेळाव्यात पालिकेच्या फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही कारवाई केली जाते असा आरोप शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांनी केला. कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे , सल्लागार प्रशांत सरखोत , शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेने अध्यक्ष भाऊ पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊ पाटील म्हणाले , फेरीवाला हटाव पथकातील अधिकारी संजय कुमावत हे अनेक वर्ष याच पदावर का आहेत ? फेरीवाल्यांकडून पालिकेने जप्त केलेला माल नक्की कुठे जातो याचे उत्तर द्यावे . फेरीवाला पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांकडून हप्ता घ