भोपर ते कोपर दिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन
भोपर ते कोपर दिवे न लावल्यास `भीक मागो ` आंदोलन
भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचा इशारा
डोंबिवली :- भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने या रस्त्यावर अंधाराचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. म्हणून भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान आणि येथील चाळकऱ्यानी स्वखर्चाने या रस्त्यावर एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडले असल्याने आता हि जबाबदारी पालिकेचे असल्याने या रस्त्यावर पथदिवे लावावीत अशी मागणी भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने केली आहे. मात्र निधी अभावी हे काम रखडणार असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करू असा इशारा भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी गजानन पाटील यांनी दिला आहे.
भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात विद्युत विभागाचे प्रमुख उपअभियंता राजेंद्र कुऱ्हेकर यांची भेट घेतली. भोपर गाव ते कोपर रेल्वे स्थानकापर्यत पथदिवे नसल्याने भोपर गावातील नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी चालणे मुश्किल झाले आहे. भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने गाव वर्गणीतून एलएडीचे दिवे लावले होते. आता हे दिवे बंद पडल्याने या रस्त्यावर पथदिवे पालिका प्रशासनाने लावावे अशी मागणी निवेदनादवारे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यानी केली आहे. याबाबत प्रमुख उपअभियंता कुऱ्हेकर यांनी निधी मिळाल्यावर गरज असल्याने २७ गावात पथदिवे लावले जातील. मात्र २७ गावात सुमारे १५० हून अधिक पथदिवे पालिकेने लावले आहेत. यावर प्रतिष्ठानचे पदाधिकारी गजानन पाटील यांनीअशी परिस्थिती असेल तर पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती . जर पालिकेकडे पथदिवे लावण्यास निधी नसेल तर आम्ही गावकर्यांना बरोबर घेऊन भीक मांगो आंदोलन करू असा इशारा दिला.
दरम्यान , २७ गावे कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट होऊन दीड वर्ष उलटले. मात्र अद्याप या गावांना निधी अभावी योग्य सुविधा देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा