फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही करतात कारवाई

भाऊ पाटील यांचा आरोप
डोंबिवली :- मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर पालिका प्रशासनाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र फेरीवाला संघटनेने यावर आपली भूमिका मांडण्यासाठी मंगळवारी डोंबिवलीत घेतलेल्या भव्य मेळाव्यात पालिकेच्या फेरीवाला हटाव पथक हप्ता घेऊनही कारवाई केली जाते असा आरोप शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांनी केला.
कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे , सल्लागार प्रशांत सरखोत , शिवगर्जना फळ-भाजी विक्रेता संघटनेने अध्यक्ष भाऊ पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊ पाटील म्हणाले , फेरीवाला हटाव पथकातील अधिकारी संजय कुमावत हे अनेक वर्ष याच पदावर का आहेत ? फेरीवाल्यांकडून पालिकेने जप्त केलेला माल नक्की कुठे जातो याचे उत्तर द्यावे . फेरीवाला पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात आणि कारवाईही करतात.
फेरीवाले हे त्यांच्या पोटा-पाण्यासाठी रस्त्यावर बसून व्यवसाय करीत असतात. मात्र पालिका आयुक्त सध्या हिटलरशाहीप्रमाणे वागत असून पालिकेच्या या कारवाईविरोधात येत्या 3 नोव्हेंबरपासून जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे डोंबिवलीत जाहीर करण्यात आले. फेरीवाल्यांविरोधात सुरू असणाऱ्या पालिका कारवाईविरोधात कष्टकरी हॉकर्स आणि भाजीविक्रेता युनियनतर्फे घेण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच या मेळाव्यात महापालिका प्रशासन, फेरीवाला विरोधी पथक, कर्मचारी यांच्यापासून ते विरोधी पक्षनेत्यापर्यंत आर्थिक देवाण-घेवाणाचे आरोप केल्याने खळबळ उडाली.
आपल्याच जीवावर हा वळू अर्थात महापालिका प्रशासन माजल्याचे सांगत त्याला वेसण घालण्याची आवश्यकता आहे. आज इंडिया शयनिंगवाल्यांचे राज्य आहे. त्यांच्या स्मार्टसिटीत आपल्याला स्थान नाही. तसेच फेरीवाल्यांविरोधातील मनसेच्या आंदोलनाला, दादागिरीला मुख्यमंत्र्यांचीच फूस असल्याचा आरोप युनियनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी केला. ज्या राजकीय पक्षांनी आमच्या पोटावर पाय दिला त्यांना येत्या निवडणुकांत अजिबात मतदान न करण्याचेही या मेळाव्यात निश्चित करण्यात आले. या हिटलरशाहीविरोधात आम्ही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगत सरखोत यांनी फेरीवाल्यांच्या बेशिस्तपणावरही जोरदार हल्ला चढवला. जनतेची सहानुभूती मिळाली तरच तुम्ही इकडे व्यवसाय करू शकाल. त्यामूळे त्यांच्याशी वागणे सुधारण्याबरोबरच लोकांना त्रास होईल असे वर्तन अजिबात करू नका अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली. तर 3 नोव्हेंबर रोजी महापालिकेवर मोर्चा काढून त्यानंतर दररोज जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.
तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतात. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा गंभीर आरोप करीत राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवालही प्रशांत सरखोत यांनी यावेळी केला.
तर विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने सरखोत यांचा व्याजाचा व्यवसाय बंद होण्याच्या नैराश्यातून त्यांनी आपल्यावर केल्याचे सांगितले. तसेच सरखोत यांनी अगोदर फेरीवाल्यांच्या भल्याच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा हिशोब द्यावा, स्वतःचे आत्मपरिक्षण करावे नंतर माझ्यावर आरोप करावेत असेही हळबे यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा