आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप



         कल्याण ;- उच्च शिक्षण घेण्याची घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. तसेच शिक्षणापासून एकही मुल वंचित राहू नये आणि सामाजिक कौटुंबिक गरिबीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून सामाजिक बांधिलकीने शालेय साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन समन्वय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष अॅड जनार्दन टावरे यांनी केले....
 मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी, धसई     येथील जिल्हा परिषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड टावरे यांनी सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आणि बालकांचे कर्तव्य याची जाणीव करून दिली..त्याचप्रमाणे निसर्ग संपत्तीची वाढ व जतन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी  सल्ला दिला...
.यावेळी एम.एस.ई.बी. चे सरळगांव येथिल मुख्य उप अभियंता तुषार फाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विजेचा वापर  आणि महत्व याबाबत माहिती दिली. तसेच प्लॅस्टिकचे  दैनंदिन वापर वाढल्याने पर्यावरणात झालेले बदल आणि  प्रदूषणामुळे पर्यावरणाची कशी हानी होत आहे व त्यावर उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्लास्टिक बंदीचे चळवळीत सामिल होऊन प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र घडविण्याचे आव्हाहन केले..यावेळी शाळेतील एकूण  63  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले....याप्रसंगी एम.एस.ई.बी.चे सरळगांव येथील मुख्य  उप अभियंता तुषार फाळे,  आशिष चौधरी ( सी.ए. ), आतिश चौधरी  ( सी.ए.), मुंबई येथील प्रसिद्ध  ताज  हॉटेलचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर मनोज गिरी,  शाळेतील शिक्षक शहाणे सर, उघडे सर, शिक्षण ग्राम समितीचे अध्यक्ष, तसेच समन्वय प्रतिष्ठानचे संतोष खेताडे, शंकर  पाटील, सुभाष सांबरे, प्रविण मालुसरे, उपस्थित होते..कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत