विवाहमैत्री डाँट काँम मुळे संस्था आणि वधुवरांचा पैसा व वेळ वाचेल..... शरद वाडेकर.
विवाहमैत्री डाँट काँम मुळे संस्था आणि वधुवरांचा पैसा व वेळ वाचेल..... शरद वाडेकर. कल्याण ( प्रतिनिधी ) : डोंबिवली पूर्व येथील कल्याण डोंबिवली महानगरपालीका कार्यालयातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विवाहमैत्री डाँट काँम( www.vivahmaitry.com) आणि सिंधुदूर्ग कुंभार समाज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वधुवर मेळावा पार पडला. विवाहमैत्री डाँट काँम हे संकेतस्थळ अलिकडेच सुरु केल्यापासुनचा हा पहिलाच मेळावा आहे. मेळाव्याचा शुभारंभ संतशिरोमणी श्री गोरोबाकाका यांच्या मुर्तीचे पूजन व दिपप्रज्वलन श्री शरद वाडेकर यांच्या हस्ते करुन झाला. नविन पिढी चोखंदळ आणि टेक सँव्ही असल्याने समाजाच्या वधुवर मेळाव्यांना आधुनिक तंत्रद्न्यानाची जोड देण्याची गरज आहे, त्याची पूर्तता विवाहमैत्री डाँट काँम या हायटेक प्लँटफाँर्ममुळे झाली आहे, त्याचा समाजसंस्थांनी लाभ उठवला पाहिजे. वर्षाला फक्त तीनशे रुपये इतक्या किफायतशीर दरात ही सेवा उपलब्ध आहे. वर्षभर रजिस्ट्रेशनची सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक संस्थेने वेगवेगळे वधुवर मेळावे लावण्यापेक्षा जवळपासच्या चारपाच संस्थां