पाण्यासाठी मनसेने घातला कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार ,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाण्यासाठी मनसेने घातला कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार ,
कल्याण ( प्रतिनिधी ): यावर्षी ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दमदार पावसामुळे धारण परिसरात समाधानकारक पाणी साठा झाला आहे, मात्र पालिकेच्या ढिसाळ वितरण व्यवस्थेमुळे कल्याण पूर्वेतील बहुतांश भागात आजहि पाणी समस्या कायम आहे .अनेकवेळा आंदोलने निवेदने देवून हि पालिका प्रशासन आश्वासना पलीकडे काहीच कार्यवाही करत नसल्याने आज संतापेल्या मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालिकेच्या ' ड ' प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला .मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने संतापेल्या मनसेच्या पदाधिकार्यांनी बंद कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार घालत निषेध नोंदवला .
यावेळी मनसैनिकाचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी प्रभाग कार्यलय गाठत सायंकाळी पालिका मुख्यालयात बैठक घेवून तोडगा काढू असे आश्वासन दिले .मात्र यावेळीतरी प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार की पुन्हा आंदोलकाना आश्वासन देऊन गुंडाळले हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे .
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने बारवी धरण चक्क दोन वेळा ओव्हर फ्लो झाल्याने पाणी साठ समाधानकारक असला तरी कल्याण डोंबिवली मध्ये आजही पाणी समस्येने नागरिक त्रस्त आहे . पाणी साठा पुरेसा असूनही पालिकेच्या ढिसाळ सदोष वितरण व्यवस्था ,पाणी गळती कडे होणारे दुर्लक्ष ,अनधिकृत नळजोडण्या यामुळे कल्याण पूर्वेतील बहुतांश भागात पानी समस्या तीव्र बनली आहे .पाणी टंचाई जणू कल्याण पूर्वेच्या पाचवीला पुजली असून याबाबत गेल्या काही महिन्यात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी निवेदने दिली, डझनभर आंदोलने केली मात्र त्यानंतर पालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणे सदर नवीन पाईप लाईन टाकण्याची फाईल मजूर होताच काम सुरु करण्यात येईल असे आंदोलन कर्त्यांना आश्वासने दिली .
मात्र त्यानंतरही तब्बल तीन महिन्यांच्या कालावधी उलटूनही अद्याप हा प्रस्ताव टेबल टू टेबल फिरत असल्याने पाणी समस्या तीव्र बनलि आहे .मात्र अनेकदा आश्वासने दिल्यानंतर प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नसल्याने कल्याण पूर्वेकडील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आज मनसेने आक्रमक आंदोलन केले . माजी नगरसेवक अनंता गायकवाड, उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे आदी पदाधिकरी कार्यकर्त्यांनी पालीकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली मात्र यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी बंद कार्यालयाला रिकाम्या बाटल्यांचा हार घालत आपला निषेध नोंदवला याच दरम्यान मनसैनिकाचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत त्यांची सम्जुत काढण्याचा प्रयत्न केला .यावेळी मनसे पदाधिकार्यांनी अधिकाऱ्यांणा धारेवर धरत एकच गोंधळ घातला . याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे मंजूरी मिळताच पुन्हा काम सुरू करण्यात येईल असे सांगितले.
एकीकडे आयुक्त बोडके यांनी पाणी व रस्त्याचे प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी तीन महिन्यांपासून हेच आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने प्रशासनाच्या भुमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा