डेब्रिज हटविल्याने अखेर नागरिकांना मिळाला रस्ता,

डेब्रिज हटविल्याने अखेर नागरिकांना मिळाला रस्ता,
नागरिकांसह  नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश


       कल्याण( प्रतिनिधी ) : जमिनीच्या मालकी हक्कच्या वादामुळे कल्याण पूर्वेतील दुर्गामाता सदन या इमारतीसह आसपासच्या इमारतीना जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  कचरा आणि डेब्रिज टाकले जाते यामुळे नागरिकांना हा कचरा व डेब्रिज तुडवत घर गाठावे लागत होते, 

        याबाबत नागरिकांसह नगरसेविका सुमन निकम व माजी नगरसेवक नितीन निकम यांनी प्रशासनकडे याबाबत पाठपुरावा करत या जागेवरील डेब्रिज हटवून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती अखेर या तक्रारीची दखल घेत पालिका प्रशासनाने डेब्रिज हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

           कल्याण पूर्वेतील दुर्गामाता सदन या इमारती समोर असलेल्या खाजगी  मोकळ्या जागेतून जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमणात कचरा आणि डेब्रिज टाकण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व घाणीचा सामना करावा लागत होता या घाणी मुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता .

           हि जागा खाजगी असुन या जागेचा वाद सुरू होता त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना कचरा व डेब्रिज तुडवत मार्गक्रमण करावे लागत होते . त्यामुले हे डेब्रिज हटविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानच्या वेब पोर्टलवर देखिल तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती .  अखेर आज माजी नगरसेवक नीतिन निकम आणि विद्यमान नगरसेविका सुमन निकम यांनी पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कचरा आणि डेब्रिज हटवून जागा  हा रस्ता नागरिकांना मोकळा करून दिल्याने नागरिकांनी समधान व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत