पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विधानसभेसाठी भाजपची तयारी सुरू

विधानसभेसाठी भाजपची तयारी सुरू 4 जागांसाठी 3 आमदारांसह 22 इच्छुक कल्याण, :- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाने आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चार विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा तारे यांचे पती साईनाथ तारे कल्याण पश्चिम भाजपतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कल्याण पश्चिमेतील विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याने भाजप याठिकाणी शिवसेनेला बेसावध ठेवण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण आणि डोंबिवली अशा 4 विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास 22 जण इच्छुक आहेत. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी डोंबिवली येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. निरीक्षकांचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केल्यानंतर उमेदवारीबाबत पक्षनेतृत्व अंतिम निर्णय घेईल असे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण पश्चिमेतील विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी तसेच ज्य

दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता असतानाही कोपर व पत्रीपुलासाठी नगरसेवक करणार रेलरोको,

दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता असतानाही कोपर व पत्रीपुलासाठी नगरसेवक करणार रेलरोको, कल्याण (प्रतिनिधी) : - रेल्वेच्या अडमुठे धोरणामुळे कल्याणच्या पत्रिपुलाचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने कल्याण डोंबिवलीकराना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असतानाच रेल्वेने डोंबिवलीतील कोपर पूल धोकादायक जाहीर करत या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकाना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे लागणार असल्याने महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत रेल्वेला जाब विचारण्यासाठी गरज पडल्यास रेलरोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत महासभा तहकूब करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा ब्रिटिश कालीन पत्रिपुल रेल्वे प्रशासनाणे धोकादायक जाहीर करत मागील वर्षी रेल्वे प्रशासनाने हातोडा मारल्यानंतर या पुलाचे काम रस्ते विकास महमडळाकडून सुरु करण्यात आले असले तरी पुलाचे काम संथगतीने सुरु आहे पूलाचे काम पूर्ण होण्यास आणखी 6 महिन्याचा कालावधी लोटणार आहे .या पुलामुळे कल्यान डोंबिवलीकर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत .त्यातच रेल्वे ने डोंबिवली

स्मार्ट सिटी अंतर्गत बसथांबे रस्त्यावर उभारणार

स्मार्ट सिटी अंतर्गत बसथांबे रस्त्यावर उभारणार          कल्याण ( प्रतिनिधी ) - कल्याण डोंबिवली शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून केडीएमटीने बस थांबे बसविले होते त्याचा उपयोग होत नव्हता  आता हे जुने बस थांबे काढून स्मार्ट सिटी अंतर्गत स्टीलचे प्रवाशी निवारे बसविण्याच्या प्रस्तावाला परिवहन समिती सभेत  मंजुरी देण्यात आली असली तरी हे निवारे उभे करण्यासाठी पालिका हद्दीत जागा नसल्याने हे निवारे फुटपाथ वर लावून प्रवाशांची कुचंबा होणार आहे,           केडीएमटीचे सुमारे 150 प्रवासी निवारे, 5 वाहतूक चौक्या, 60 मोठ्या व  40 मिडी असे एकूण 100 बसेस व बसमधील आसनाच्या पाठी मागील भागावर व हॅन्डलवर जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी एका खासगी ठेकेदारची नेमणूक केली होती .मात्र शहरातील अनेक भागात बस थांबे वर अतिक्रमण झाले असून पावसाळ्यात प्रवाश्याना उपयोग होत नसल्याचे चित्र आहे .           पालिका मुख्यालयत परिवहन समितीची सभा संपन्न झाली . यात केडीएमटीचे कार्यरत जुने प्रवासी निवारे निष्कासित करून स्मार्ट सिटी अंतर्गत केडीएमटीचे स्टीलचे नवीन  प्रवासी निवारे उभारणी करणेबाबत अनुभवी कंत्राटदार नि