दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता असतानाही कोपर व पत्रीपुलासाठी नगरसेवक करणार रेलरोको,


दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता असतानाही कोपर व पत्रीपुलासाठी नगरसेवक करणार रेलरोको,



कल्याण (प्रतिनिधी) : - रेल्वेच्या अडमुठे धोरणामुळे कल्याणच्या पत्रिपुलाचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने कल्याण डोंबिवलीकराना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असतानाच रेल्वेने डोंबिवलीतील कोपर पूल धोकादायक जाहीर करत या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकाना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे लागणार असल्याने महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत रेल्वेला जाब विचारण्यासाठी गरज पडल्यास रेलरोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत महासभा तहकूब करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला.

कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा ब्रिटिश कालीन पत्रिपुल रेल्वे प्रशासनाणे धोकादायक जाहीर करत मागील वर्षी रेल्वे प्रशासनाने हातोडा मारल्यानंतर या पुलाचे काम रस्ते विकास महमडळाकडून सुरु करण्यात आले असले तरी पुलाचे काम संथगतीने सुरु आहे पूलाचे काम पूर्ण होण्यास
आणखी 6 महिन्याचा कालावधी लोटणार आहे .या पुलामुळे कल्यान डोंबिवलीकर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत .त्यातच रेल्वे ने डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या महत्वाच्या कोपर पुल देखील धोकादायक झाला असून या पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले होते.


कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांना वाहतूक कोंडीचा विळखा पडला असून या वाहतूक कोंडीबाबत जाब विचारण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक रमेश म्हात्रे, आणि राहुल दामले यांनी महासभेत सभा तहकुबी मांडली होती. या विषयावर रमेश म्हात्रे आणि दामले यांच्यासह सचिन बासरे, दिपेश म्हात्रे, मनसे गटनेते मंदार हळबे, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी चर्चा करत वाहतूक कोंडी तसेच पालिका प्रशासन,शासन तसेच रेल्वेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी आयुक्त गोविंद बोडके यांनी शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने दुसर्या मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेकडून अभिप्राय घेण्यासाठी वेळ मागितला होता. हा कालावधी 28 ऑगस्ट रोजी संपत असल्यामुळे या तारखेपासून या पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सूचना पुन्हा रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.

यानंतर पालिका प्रशासनाने या पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यत रेल्वेचे जुने फाटक उघडून द्यावे अशी मागणी रेल्वेकडे केली होती .मात्र रेल्वे ने ही मागणी देखील धुडकावून लावली आहे .रेल्वेकडून कोणत्याही प्रकारे सहकार्य मिळत नसल्याचे पालिका आयुक्तनि आज झालेल्या महासभेत सांगितले .तसेच रेल्वेला या पुलासाठी किती पैसे भरायचे यासाठी पूर्वी केलेल्या कराराची प्रत मागितली मात्र हि प्रत देण्यास रेल्वे प्रशासन टाळाटाळ करत असून इतर विषयावर देखील रेल्वेकडून सहकार्य मिळत नसल्याचे बोडके यांनी स्पष्ट केले .त्यानंतर संतप्त नगरसेवकांनी रेल्वेला हव्या असलेल्या सुविधा आपण तत्काळ देतो मात्र रेल्वेकडून आपल्या मागण्यांना विनंती धुडकावल्या जात असतील तर 127 नगरसेवक रेल्वे अधिकार्याच्या दालनात वेळ घेऊन धडक देत त्यांना जाब विचारतील किंवा रेल्वे ट्रकवर उतरून रेलरोको छेडत जाब विचारतील हे टाळायचे असेल तर पूल तोडून नागरिकाची कोंडी करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्थेबाबत रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासनाने तोडगा काढावा असा इशारा देत रेल्वेच्या मनमानी विरोधात निषेध व्यक्त करत आजची महासभा तहकूब केली.

चौकट

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे हे 5 वेळा निवडून आले असून 3 वेळा स्थायी समिती सभापती तर भाजप नगरसेवक राहुल दामले 1 वेळा सभापती पद उपभोगले आहे, तर दीपेश म्हात्रे हे सभापती आहेत, सेना भाजपचे 4 आमदार तर 2 खासदार असून गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असतानाही वाहतूक कोंडी सोडवू शकले नसल्याने नागरिकांत सेना भाजपाच्या कारभाराबाबत शंका उत्पन्न होत आहे,


शहाड आंबिवली रेल्वे मार्गावरील वडवली उड्डाणपूलाचे काम गेल्या 8 वर्षांपासून सुरू असून रेल्वेने त्यांच्या हद्दीतील काम 6 वर्षांपूर्वी पूर्ण केले असून महापालिका आपल्या हद्दीतील काम कधी पूर्ण करणार असा सवाल सेनेचे नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांनी उपस्थित केला मात्र सत्ताधाऱ्यांनी शेट्टी याना शांत बसवले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत