स्मार्ट सिटी अंतर्गत बसथांबे रस्त्यावर उभारणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्मार्ट सिटी अंतर्गत बसथांबे रस्त्यावर उभारणार
कल्याण ( प्रतिनिधी ) - कल्याण डोंबिवली शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून केडीएमटीने बस थांबे बसविले होते त्याचा उपयोग होत नव्हता आता हे जुने बस थांबे काढून स्मार्ट सिटी अंतर्गत स्टीलचे प्रवाशी निवारे बसविण्याच्या प्रस्तावाला परिवहन समिती सभेत मंजुरी देण्यात आली असली तरी हे निवारे उभे करण्यासाठी पालिका हद्दीत जागा नसल्याने हे निवारे फुटपाथ वर लावून प्रवाशांची कुचंबा होणार आहे,
केडीएमटीचे सुमारे 150 प्रवासी निवारे, 5 वाहतूक चौक्या, 60 मोठ्या व 40 मिडी असे एकूण 100 बसेस व बसमधील आसनाच्या पाठी मागील भागावर व हॅन्डलवर जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी एका खासगी ठेकेदारची नेमणूक केली होती .मात्र शहरातील अनेक भागात बस थांबे वर अतिक्रमण झाले असून पावसाळ्यात प्रवाश्याना उपयोग होत नसल्याचे चित्र आहे .
पालिका मुख्यालयत परिवहन समितीची सभा संपन्न झाली . यात केडीएमटीचे कार्यरत जुने प्रवासी निवारे निष्कासित करून स्मार्ट सिटी अंतर्गत केडीएमटीचे स्टीलचे नवीन प्रवासी निवारे उभारणी करणेबाबत अनुभवी कंत्राटदार नियुक्ती प्रस्ताव एक मताने मंजूर झाले असल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी जाहीर केले, मात्र नव्याने उभारण्यात येणारे बस निवारे याला जागा भरपूर लागणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला तरी अंमलबजावणी होताना तांत्रिक अडचणी होणार असल्याने हे प्रवाशी बस थांबे मात्र फुटपाथवर उभारून प्रवाश्यांचा खोळंबा मात्र नक्की होणार आहे,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Borgata Hotel Casino & Spa - MapYRO
उत्तर द्याहटवाBorgata Hotel Casino 구리 출장안마 & Spa · 상주 출장안마 3131 Las Vegas Blvd S · (702) 770-3000 · Visit Website. https://www.tripadvisor.com/borgata-hotels/ · See 부천 출장마사지 569 unbiased reviews 포천 출장샵 of Borgata Hotel Casino 전라남도 출장샵 & Spa.