स्वामी समर्थ मठाचा उपक्रम
सामाजिक भान जपत ध्वजावरोहन साजरे
स्वामी समर्थ मठाचा उपक्रम
कल्याण( प्रतिनिधी):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी वाढत राहावी याकरिता देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज जवळील फॉरेस्ट कॉलनी मधील स्वामी समर्थ मठात आदरणीय गुरुमाऊली नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) यांच्या हस्ते आज 13 रोजी राष्ट्रध्वजचे ध्वजारोहण करण्यात आले,
‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस्त्र परिधान करून पायी यात्रा काढण्यात येणार असून सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज असणार असल्याची माहिती सचिन चांदे महाराज यांनी दिली,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा