पोस्ट्स

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

इमेज
  ममता बॅनर्जी विरोधात कल्याण मध्ये आंदोलन कल्याण (प्रतिनिधी):-  पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहानला यांनी संदेशखाली येथील महिलेवर अत्याचार केले आहे तरी त्यांना 55 दिवस लपवून ठेवल्याच्या निषेधार्थ कल्याण जिल्हा भाजप महिला मोर्चा तर्फे आज कल्याण येथील शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले,  पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी  खुद्द एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जातोय. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे गुंडच या अत्याचारांमध्ये सामील आहेत. संदेशखालीतल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना तर फक्त हिमनगाचं टोक आहे. या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली..आज संपुर्ण राज्यभरात भाजप महिला मोर्चा कडून आंदोलन करण्यातं आले, ममता बॅनर्जींनी तृणमूलच्या गुंडांचा नंगानाच महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तातडीने चौकशी

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

इमेज
 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील.  मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत

इमेज
  प्रगतीचे प्रतिबिंब उमटविणारा विकसित भारत संकल्पाचा परिपूर्ण आराखडा! केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत           कल्याण ( प्रतिनि धी ) :- ‘येत्या पंचवीस वर्षांत विकसित भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी पथदर्शी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प, अशा शब्दात केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. विकासाच्या दिशेने वेगाने मार्गाक्रमणाची हमी देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून देशातील शेतकरी, गरीब, महिला शक्ती आणि युवाशक्तीच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले आहे, अशा शब्दांत भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.              महिला युवक, गरीब आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी समर्पित असलेल्या या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशाचे भवितव्य घडविणाऱ्या या चार वर्गांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत, असेही सुर्यवंशी यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.           एक कोटी घऱांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवून गोरगरीबांची घरे उजळ

पुन्हा देवेंद्रजींबद्दल बोलाल तर भाजपा घराबाहेर पडू देणार नाही

इमेज
  विश्वासघाती उद्धव ठाकरेंना शेवटचा इशारा,  पुन्हा देवेंद्रजींबद्दल बोलाल तर भाजपा घराबाहेर पडू देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा       मुंबई(प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या बेईमान आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पूर्ण अपयशी होते. त्यांच्या मंत्र्याचे दाऊदबरोबर संबंध स्पष्ट झाले आणि त्याला तुरुंगात जावे लागले तरीही उद्धव ठाकरे त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढू शकले नाहीत. सत्तेसाठी त्यांनी लाळघोटेपणा केला. वाझेसारख्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही त्यांनी लाळघोटेपणा केला. अशा बेईमान, विश्वासघाती आणि घरकोंबड्या व्य

शालेय पोषण आहाराची होणार तपासणी

  कल्याण (प्रतिनिधी):- केंद्र आणि राज्य शासनातर्फे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना राबवली जाते. त्यात तांदूळ आणि अन्य धान्य शाळांना पुरवण्यासाठी जिल्हानिहाय पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासाठी पुरवठादारांबरोबर करारनामा करण्यात आला आहे. धान्यांची बांधणी, गोदाम ते शाळांमध्ये मालाची चढ-उतार, वाहतूक आणि सुरक्षित वितरण याची संपूर्ण जबाबदारी पुरवठादाराचीच राहणार आहे. धान्यांच्या पोत्यांवर 'प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, विक्रीसाठी नाही' असा उल्लेख असणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार आणि जिल्ह्यांनी नोंदवलेल्या मागणीनुसार धान्याचा पुरवठा करणे पुरवठादारास बंधनकारक आहे. या धान्याची भरारी पथकातर्फे तपासणी केली जाईल. प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी दर महिन्याला पुरवठादाराच्या गोदामांना भेट देऊन तांदूळ आणि धान्यांचा दर्जा, साठवणूक, वितरण आणि शिल्लक धान्याबाबतच्या नोंदीची तपासणी करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करतील. पुरवठादारांनी निकृष्ट धान्य पुरवल्याचे आणि प्रयोगशाळेत तपासणी करून समाधानकारक अहवाल प्राप्त न झ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे मागणी

इमेज
  गुरचरण जमिनीवर अतिक्रमण हटविण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्या- माजी आमदार नरेंद्र पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे  मागणी कल्याण ( प्रतिनिधी) :- सरकारी गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात शासन मार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,  राज्यातील अनेक भटके विमुक्त व इतर घटक गुरचरण जमिनीवर आपले वास्तव्य करत आहेत, त्यांच्यावर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे, मोठ्या संख्येने वंचित घटक यागुरचरण जमिनीवर राहत असताना मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाने ही कारवाई होत आहे मात्र शासनानेही हा निर्णय पारित केला आहे, या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून स्थगिती देण्यात यावी व वंचित आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी ही मागणी कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. गेली अनेक वर्षे भटका विमुक्त समाज या शासकीय गायरान जमिनीवर वास्तव्य करत असून, उच्च न्यायालयाने निष्कासित करण्याच्या अनुषं

माजी आमदार नरेंद्र पवार

इमेज
  माजी आमदार नरेंद्र पवार यांची जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड                कल्याण (प्रतिनिधी):-  जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी कल्याण पश्चिम येथील माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. साल 2022 ते 2027 या पंचवार्षिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. नरेंद्र पवार हे या अगोदरही जनकल्याण बँकेच्या संचालक पदावर होते, त्यांची ही तीसऱ्यांदा निवड झाली आहे.                 जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था आहे, गेली 46 वर्षांपासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात काम करणारी ही बँक आहे. गेल्या 46 वर्षांपासून सुरू असलेल्या या बँकेत आज 2130 कोटींच्या ठेवी आहेत, तर 972 कोटी रुपये कर्ज वाटपाची रक्कम आहे. एकूण बँकेचे 62 हजार सभासद आहेत. त्या सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने मोठा पल्ला गाठला आहे, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत अभ्यासू आणि प्रामाणिकपणे काम करणारे नरेंद्र पवार जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही अत्यंत अभ्यासूपणे काम करत आहेत. त्यांची निवड झाल्या