मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे मागणी

 गुरचरण जमिनीवर अतिक्रमण हटविण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्या- माजी आमदार नरेंद्र पवार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे  मागणी



कल्याण ( प्रतिनिधी) :- सरकारी गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात शासन मार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,  राज्यातील अनेक भटके विमुक्त व इतर घटक गुरचरण जमिनीवर आपले वास्तव्य करत आहेत, त्यांच्यावर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे, मोठ्या संख्येने वंचित घटक यागुरचरण जमिनीवर राहत असताना मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाने ही कारवाई होत आहे मात्र शासनानेही हा निर्णय पारित केला आहे, या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून स्थगिती देण्यात यावी व वंचित आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी ही मागणी कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

गेली अनेक वर्षे भटका विमुक्त समाज या शासकीय गायरान जमिनीवर वास्तव्य करत असून, उच्च न्यायालयाने निष्कासित करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे,त्यामुळे असंख्य हजारो कुटुंब बेघर होतील. यामध्ये प्रामुख्याने भटके विमुक्त समाजातील घटक मोठ्या प्रमाणात भरडला जाणार आहे अशी भीतीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य सरकारकडे व्यक्त केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत