माजी आमदार नरेंद्र पवार
माजी आमदार नरेंद्र पवार यांची जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड
कल्याण (प्रतिनिधी):- जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी कल्याण पश्चिम येथील माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. साल 2022 ते 2027 या पंचवार्षिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. नरेंद्र पवार हे या अगोदरही जनकल्याण बँकेच्या संचालक पदावर होते, त्यांची ही तीसऱ्यांदा निवड झाली आहे.
जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था आहे, गेली 46 वर्षांपासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात काम करणारी ही बँक आहे. गेल्या 46 वर्षांपासून सुरू असलेल्या या बँकेत आज 2130 कोटींच्या ठेवी आहेत, तर 972 कोटी रुपये कर्ज वाटपाची रक्कम आहे. एकूण बँकेचे 62 हजार सभासद आहेत. त्या सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने मोठा पल्ला गाठला आहे, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत अभ्यासू आणि प्रामाणिकपणे काम करणारे नरेंद्र पवार जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही अत्यंत अभ्यासूपणे काम करत आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर भाजप कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा सुचिता संतोष होळकर तसेच सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा