पोस्ट्स

कांगारुंची विश्वकरंडकावर पाचव्यांदा मोहोर

कांगारुंची विश्वकरंडकावर पाचव्यांदा मोहोर - दुसऱ्याच षटकात १ बाद २ अशी अवस्था झाल्यानंतरही दबावाखाली न येता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी संयमी व चतुराईने खेळी करीत १८४ धावांचे सोपे लक्ष्य ३३.१ षटकांमध्ये सहज गाठत पाचव्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. 

'भारतरत्न' अटलजी...

इमेज
'भारतरत्न' अटलजी... नवी दिल्ली - ‘गीत नया गाता हूँ,‘ असा दुर्दम्य विश्‍वास कोट्यवधी भारतीयांच्या मनात जागविणारे अग्रणी संसदपटू व दिग्गज राजनेते, वक्ता दशसहस्रेषू, हळव्या मनाचे कवी या साऱ्या गुणांचा समुच्चय असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ऊर्फ कोट्यवधी कार्यकर्त्यांचे लाडके अटलजी आज "भारततरत्न‘ बनले... राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सायंकाळी साडेपाचला वाजपेयी यांच्या 6-कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. अटलजींमुळे जणू या सन्मानाचीच उंची आणखी वाढली... पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लालकृष्ण अडवानी, मुफ्ती महंमद सईद यांच्यासह पाच मुख्यमंत्री, सरसंघचालक मोहन भागवत व सारे केंद्रीय मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना "अटलजी हे मूर्तिमंत स्टेट्‌समन आहेत व ते खऱ्या अर्थाने भारतरत्नचे मानकरी आहेत,‘ असे नमूद केले. 

सोशल मीडियाची गळचेपी संपली!

सोशल मीडियाची गळचेपी संपली! नवी दिल्ली : सोशल मीडियातून अथवा इंटरनेटवरून 'आक्षेपार्ह' मजकूर पाठविणे हा गुन्हा ठरवून त्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणारे 'इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँक्ट'चे वादग्रस्त कलम ६६ए सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनाबाह्य ठरवून रद्द केले. परिणामी, या कलमाच्या आधारे पोलिसी कारवाई होण्याची टांगती तलवार दूर झाल्याने सोशल मीडिया बेलगाम तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत असतानाच दुसरीकडे न्यायालयाच्या या निकालाने नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सवरेपरी मानून ते अधिक बळकट केले गेल्याने त्याचे सर्वदूर स्वागतही होत आहे.

महाराष्ट्रातील ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहे

  महाराष्ट्रातील ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहे                                                                                           मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस        महाराष्ट्रात निसर्गाने  थैमान घातले असले तरी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. ५ हजार गावे दुष्काळ मुक्त करायची आहेत .  टीका करणारे टीका करतात.मात्र प्रामाणिक  काम हाती घेतले असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची शक्ती डे अशी प्राथर्ना केली आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत स्वागतयात्रेत सांगितले.      १७ व्या नववर्ष स्वागत यात्रेच्या समारोप प्रसंगी श्री गणेश मंदिराजवळ झालेल्या समारोप समारंभात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार  क...

भटक्या-विमुक्त जमातींसाठी राष्ट्रीय आयोग

भटक्या-विमुक्त जमातींसाठी राष्ट्रीय आयोग  भटक्या व विमुक्त जमातींसाठी (एनसीडीएनटी) केंद्र सरकारकडून जानेवारी 2015 मध्ये एक राष्ट्रीय आयोग गठीत करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरामध्ये वरील माहिती दिली. या आयोगामध्ये काही महत्त्वाच्या विषयांचा विचार करण्यात येणार आहे. निम-भटक्या व विमुक्त जमातींशी संबंधित जातींची राज्यवार सूची तयार करण्यात येईल. अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास वर्गांतील केंद्र व राज्याच्या सूचीमधील विमुक्त आणि भटक्या जमाती निवडणे, तसेच ज्या भटक्या-विमुक्त जमातींना अद्याप अनुसूचित जाती-जमातींमध्ये अथवा इतर मागासवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही अशा जाती ओळखण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या भागांमध्ये अशा भटक्या विमुक्त जमातींची संख्या अधिक आहे असे भाग निश्चित करण्याचे काम करण्यात येणार आहे. 
'आयुक्त हटाव'चा नारा! 'कडोंमपा'त गोंधळ : सेनेवर टीका करीत विरोधकांचा हल्लाबोल : सत्ताधारी शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीत विरोधकांसाठी गळचेपी धोरण सुरू असून, कल्याण-डोंबिवली महापालिका ही काय शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? विरोधकांना सोडाच, परंतु सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपालाही येथे विचारात घेतले जात नाही. सत्ता म्हणजे मनमानी कारभार करायचा काय, असा सवाल करून काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्‍वनाथ राणे यांनी राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवक-पदाधिकार्‍यांना हाताशी घेऊन शिवसेनेच्या मनमानी कारभारावर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यास साथ देणार्‍या आयुक्तांविरोधात 'आयुक्त हटाव'चा नारा त्यांनी दिल्याने शनिवारी महापालिकेच्या मुख्यालयात गोंधळासह तणावाचे वातावरण होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सत्ताधार्‍यांव्यतिरीक्त विरोधी पक्षनेते, मनसेचे गटनेते, राष्ट्रवादीचे गटनेते आदींना डावलून येथील विकास प्रकल्पांबाबत सविस्तर सहा तासांची चर्चा केली. त्या चर्चेत आयुक्तांना अनेक सूचना केल्या. दोघा अभियंत्यांवर निलंबनाचे आदेशही देण्यात ...
छत्रपती शिवाजी महाराज कि जय शिव जयंती  व महिला दिनाच्या हार्दिक सुभेस्च्या