भटक्या-विमुक्त जमातींसाठी राष्ट्रीय आयोग

भटक्या-विमुक्त जमातींसाठी राष्ट्रीय आयोग



 भटक्या व विमुक्त जमातींसाठी (एनसीडीएनटी) केंद्र सरकारकडून जानेवारी 2015 मध्ये एक राष्ट्रीय आयोग गठीत करण्यात आला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरामध्ये वरील माहिती दिली.
या आयोगामध्ये काही महत्त्वाच्या विषयांचा विचार करण्यात येणार आहे. निम-भटक्या व विमुक्त जमातींशी संबंधित जातींची राज्यवार सूची तयार करण्यात येईल.
अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास वर्गांतील केंद्र व राज्याच्या सूचीमधील विमुक्त आणि भटक्या जमाती निवडणे, तसेच ज्या भटक्या-विमुक्त जमातींना अद्याप अनुसूचित जाती-जमातींमध्ये अथवा इतर मागासवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही अशा जाती ओळखण्याचे काम करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे कोणत्या भागांमध्ये अशा भटक्या विमुक्त जमातींची संख्या अधिक आहे असे भाग निश्चित करण्याचे काम करण्यात येणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत