'आयुक्त हटाव'चा नारा!
|
'कडोंमपा'त गोंधळ : सेनेवर टीका करीत विरोधकांचा हल्लाबोल
|
: सत्ताधारी शिवसेनेचे कल्याण-डोंबिवलीत विरोधकांसाठी गळचेपी धोरण सुरू असून, कल्याण-डोंबिवली महापालिका ही काय शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? विरोधकांना सोडाच, परंतु सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपालाही येथे विचारात घेतले जात नाही. सत्ता म्हणजे मनमानी कारभार करायचा काय, असा सवाल करून काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवक-पदाधिकार्यांना हाताशी घेऊन शिवसेनेच्या मनमानी कारभारावर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यास साथ देणार्या आयुक्तांविरोधात 'आयुक्त हटाव'चा नारा त्यांनी दिल्याने शनिवारी महापालिकेच्या मुख्यालयात गोंधळासह तणावाचे वातावरण होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सत्ताधार्यांव्यतिरीक्त विरोधी पक्षनेते, मनसेचे गटनेते, राष्ट्रवादीचे गटनेते आदींना डावलून येथील विकास प्रकल्पांबाबत सविस्तर सहा तासांची चर्चा केली. त्या चर्चेत आयुक्तांना अनेक सूचना केल्या. दोघा अभियंत्यांवर निलंबनाचे आदेशही देण्यात आले. हे निर्णय घेतांना विरोधकांना विश्वासात का घेतले नाही? असा सवाल करून त्यांनी आयुक्त एम. आर्दड यांना धारेवर धरले. त्याहूनही कहर म्हणजे रिंगरुट प्रकल्पासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकार्यांसमवेत आयुक्तांची पालिका मुख्यालयात बैठक घेतली. आयुक्तांच्या विरोधाचे कारण आजच्या बैठकीत सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षनेत्यांना, अन्य पक्षांच्या गटनेत्यांना विचारात घेतलेले नव्हते. त्यामुळे आयुक्त भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत सर्वजण संतापले. |
डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा