पोस्ट्स

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे मागणी

इमेज
  गुरचरण जमिनीवर अतिक्रमण हटविण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्या- माजी आमदार नरेंद्र पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे  मागणी कल्याण ( प्रतिनिधी) :- सरकारी गुरचरण जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भात शासन मार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे,  राज्यातील अनेक भटके विमुक्त व इतर घटक गुरचरण जमिनीवर आपले वास्तव्य करत आहेत, त्यांच्यावर या निर्णयामुळे अन्याय होणार आहे, मोठ्या संख्येने वंचित घटक यागुरचरण जमिनीवर राहत असताना मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशाने ही कारवाई होत आहे मात्र शासनानेही हा निर्णय पारित केला आहे, या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून स्थगिती देण्यात यावी व वंचित आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी ही मागणी कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. गेली अनेक वर्षे भटका विमुक्त समाज या शासकीय गायरान जमिनीवर वास्तव्य करत असून, उच्च न्यायालयाने निष्कासित कर...

माजी आमदार नरेंद्र पवार

इमेज
  माजी आमदार नरेंद्र पवार यांची जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड                कल्याण (प्रतिनिधी):-  जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी कल्याण पश्चिम येथील माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. साल 2022 ते 2027 या पंचवार्षिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. नरेंद्र पवार हे या अगोदरही जनकल्याण बँकेच्या संचालक पदावर होते, त्यांची ही तीसऱ्यांदा निवड झाली आहे.                 जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था आहे, गेली 46 वर्षांपासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात काम करणारी ही बँक आहे. गेल्या 46 वर्षांपासून सुरू असलेल्या या बँकेत आज 2130 कोटींच्या ठेवी आहेत, तर 972 कोटी रुपये कर्ज वाटपाची रक्कम आहे. एकूण बँकेचे 62 हजार सभासद आहेत. त्या सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने मोठा पल्ला गाठला आहे, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत अभ्यासू आणि प्रामाणिकपणे काम करणारे नरेंद्र पवार जनकल्याण सहकारी बँकेच्या संचाल...

भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

इमेज
  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया स्थगित करा- माजी आमदार नरेंद्र पवार  भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप  कल्याण (प्रतिनिधी) :- ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँकेच्या भरतीमध्ये असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून सदर भरती प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे, याबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यात ही मागणी केली आहे.  दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने  दिनांक २६-०८-२२ रोजी उमेदवारांकडून  नवीन अर्ज मागितले होते. सदर पदभरती प्रक्रियेत अनेक युवकानी सहभाग घेतला आहे. दिनांक २४.०९.२२ रोजी परिक्षा प्रक्रिया झाली असून नुकताच निकाल व यादी जाहीर झाली असून या भरती प्रक्रियेत अनधिकृत रित्या आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाला आहे. भरती प्रक्रिया नियमानुसार न होणे,  मेरीट प्रमाणे भरती न होणे, व योग्य उमेदवाराची पदभरती न होणे या प्रकारामुळे भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ निदर्शनास आला असल्याचा आरोप नरेंद्र पवार यांनी केला आहे....

काँग्रेस पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही

इमेज
  काँग्रेस पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे  मुंबई(प्रतिनिधी) :- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ते भंडारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, खा. सुनील मेंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे, आ. परिणय फुके आणि प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे सहप्रमुख मा. विजय चौधरी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले ...

भागव्यामय वातावरणात तिरंगा रॅली,

इमेज
  कल्याण मध्ये निघाली,भागव्यामय वातावरणात तिरंगा रॅली          कल्याण(प्रतिनिधी):- ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद  महाराज ( मोडक महाराज ) यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी 11 वाजता फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस्त्र परिधान करून पायी यात्रा काढण्यात आली यावेळी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, सर्वांच्या हातात तिरंगा ध्वज व देश भक्तीपर घोषणा देत पदयात्रा काढण्यात आली,          फॉरेस्ट कॉलनीतील मठापासून सुरू झालेली पदयात्रा मुरबाड रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून काळा तलाव बेतूरकर पाडा खडकपाडा मार्गे पुन्हा मठात येऊन महाभांडारा घेऊन सांगता झाली, यावेळी गुरुवर्य नावनीतानंद महाराज मोडक महाराज यांच्या सह माजी आमदार नरेंद्र पवार, माजी परिवहन सद...

स्वामी समर्थ मठाचा उपक्रम

इमेज
  सामाजिक भान जपत ध्वजावरोहन साजरे स्वामी समर्थ मठाचा उपक्रम             कल्याण( प्रतिनिधी):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी वाढत राहावी याकरिता देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज जवळील फॉरेस्ट कॉलनी मधील स्वामी समर्थ मठात आदरणीय गुरुमाऊली नवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) यांच्या हस्ते आज 13 रोजी राष्ट्रध्वजचे ध्वजारोहण करण्यात आले,             ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नवनीतानंद  महाराज ( मोडक महाराज ) यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी फॉरेस्ट कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत गुरुबंधू व गुरुभगिनी भगवेवस...

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी, सामान्य जनतेला दिलासा,

इमेज
  पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी, सामान्य जनतेला दिलासा, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,   कल्याण ( प्रतिनिधी):- पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले आहे.          एका प्रसिद्धी पत्रकात शशिकांत कांबळे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स...