शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे मंत्री काम करत आहेत: रविंद्र चव्हाण कल्याण : लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें केंद्र व राज्यातील भाजपचे मंत्री लोकहिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वमधील एका कार्यक्रमात केले. भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील आयोजित कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदीर शाळेत दोन दिवसीय शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उदघाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रदर्शन आयोजक संजय मोरे, संतोष पाटील तसेच शस्र संग्रहित करणारे सुनील कदम यांचे कौतुक करत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की शस्त्र प्रदर्शन पाहून आनंद झाला, यातून एकच सिद्ध होते की शिवाजी महाराज यांनी केलेली प्रत्येक लढाई महत्त्वपूर्ण होती आणि वेळेनुसार त्यांनी आणि त्यांच्या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा