अंगण वाडी सेविका प्रश्न लवकर मार्गी लागतील :- वर्षा ताई गायकवाड
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मुंबई: अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न केले जातील. तशीच वेळ आल्यास मुख्यमंत्री निधीतूनही अर्थसहाय्य मिळावे यासाठीही मी प्रयत्न करेन, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिले. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे बरेच प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्ठमंडळाने महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अंगणवाडी सेविकांचे दर महिन्याचे मानधन वेळेवर मिळावे व हे मानधन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत मिळावे, १ एप्रिल २०१४ पासून जाहीर केलेल्या मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, त्याचप्रमाणे मिनीअंगणवाडी सेविकांना १ जुलै २०१४ पासून जाहीर केलेली मानधनवाढ थकबाकीसह लवकरात लवकर मिळावी, हे निवेदनातील सर्वात महत्वाचे मुद्दे होते. याशिवाय अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवासामाप्ती लाभाविषयीचा शासकीय आदेश २००८ पासून लागू करण्यात यावा, त्यांनी पूर्ण केलेय सेवेसाठी, मासिक मानधनाच्या ७५ टक्के रक्कम देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना सेवासामाप्ती लाभ दिल्यानंतरच सेवामुक्त करण्यात यावे, एक महिन्याच्या मानधनाएवढी भाऊबीज भेट देण्यात यावी, या सेविकांना दरवर्षी २१ दिवसांची आजारपणाची पगारी रजा मंजूर करावी, त्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, अंगणवाडीसाठी लागणारे सामान केंद्रात पोच करण्यात यावे, अंगणवाडी केंद्राला देण्यात येणाऱ्या रकमेमधून कोणताही प्रशासकीय खर्च करण्यात येऊ नये, अशा विविध मागण्या या शिष्ठमंडळाने सादर केल्या. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावेत, यासाठी आम्ही आधीही प्रयत्न केले होते व आताही आमचे प्रयत्न सुरुच आहेत. अंगणवाडी सेविकांच्या समस्यांबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाईल. हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडूनही निश्चित सहकार्य मिळेल, असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री वर्ष गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या 86 व्या वर्षी देवाज्ञा झाली. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा