संतोष होळकर तरुण शक्ती संपादक
पोस्ट्स
2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Wednesday, 8 May 2013 पत्रकारिता कशी आहे, कशी असावी? पत्रकारिता आपल्या सार्वजनिक जीवनाचा आता अविभाज्य भाग बनलेली आहे. आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. याचा अर्थच हा की सर्व शक्तींचे केंद्रीकरण आपणांस मान्य नाही. असे केंद्रीकरण हे हुकूमशाही व्यवस्थेचे लक्षण आहे. ‘लोकशाही’ म्हटले तरी व्यवस्था आलीच. सामान्यत:, या राज्यव्यवस्थेचे परस्परांशी जडलेले, पण परस्परांपासून स्वतंत्र असलेले आणि परस्परांवर अंकुशही ठेवू शकणारे, तीन भाग सर्वत्र मान्यता पावलेले आहेत. १) विधायिका- म्हणजे कायदे मंडळ. या मंडळाकडे कायदे करण्याचे अधिकार आहेत; आणि या मंडळात लोकांचे प्रतिनिधी समाविष्ट असतील, २) कार्यपालिका- म्हणजे प्रशासकीय व्यवस्था. कायद्यांची अंमलबजावणी कोण करणार?अर्थात् प्रशासन, म्हणजेच सरकार करणार. हीच कार्यपालिका होय आणि ३) न्यायपालिका- कायद्याच्या शब्दांचे व त्यामागील भावनेचे मर्म ध्यानात घेऊन, त्या कायद्यांची अंमलबजावणी कार्यपालिकेकडून नीट झाली की नाही, हे बघणारी व्यवस्था म्हणजे न्यायपालिका. चौथा स्तंभ या तीन व्यवस्था लोकशाही पद्धतीची तीन महत्त्वाची अंगे असली तरी त्या परस्परांशी जडलेल्या आहेत.
दहीहंडी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डोंबिवलीत बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठानची अध्यामिक दहीहंडी डोंबिवली :- दि. २३ ( प्रतिनिधी) डोंबिवलीजवळील आजदेगावातील दत्तमंदिर चौकात वैकुंठवासी ह.भ.प. बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे यंदाही अध्यामिक दहीहंडी लावण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रतिष्ठानने अध्यक्ष वासुदेव पाटील म्हणाले , जिकडे तिकडे राजकीय छाप असलेल्या दहीहंड्या बांधल्या जातात. मात्र सामाजिक जाणीवेबरोबर अध्यामिक विचारांचा पगडा असलेल्या दहीहंडी उभारण्याचा आमचा उद्देश आहे. यावर्षी २ लाख २२ हजार २२२ रुपये अशी बक्षिसाची रक्कम आहे. यावर्षी आजदे गावातील यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील १ ली ते ७ वी इयत्तेतील उत्तीर्ण झालेल्या २१ विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. बुधाजी पाटील , मदन भोईर , जितेश पाटील , विशाल पाटील , अरविंद काळण, वरूण पाटील , अमित म्हात्रे , तुषार मालवणकर , शामू पेतेकर यांसह अनेकांचे सहकार्य लाभते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।। " वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।। " वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।। " वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।। प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोयी प्रमाणे येत नाही, म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाकमधील एका पित्याचे 100 मुलांचे स्वप्न - - वृत् क्वेट्टा- पाकिस्तानमधील एका 46 वर्षीय पित्याचे 100 मुलांचे स्वप्न आहे. सध्या तीन पत्नींपासून त्याला 35 मुले आहेत. आपण एक धार्मिक काम करत असल्याचे तो सांगतो. सरदार जन मोहम्मद खिल्जी (वय 46) असे त्या पित्याचे नाव आहे. खिल्जीचे स्वप्न साकार होण्यासाठी त्याच्या तीन पत्नींसह कुटुंबीय मदत करत आहे. कुटुंबीयांनी चौथ्या विवाहासाठी तयारी सुरू केली आहे. शंभर मुलांसह आम्ही पती-पत्नी आनंदात राहू, असे त्याच्या पत्नींनी सांगितले. ‘पाकिस्तानमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करण्यास परवानगी आहे. खिल्जीच्या पत्नींची काही तक्रार नसेल तर कोणी काही बोलू शकत नाही. यामुळे तो त्याचे 100 मुलांचे स्वप्न साकार करू शकतो,‘ असे माहिला अधिकार कार्यकर्त्या राफिया झकारिया यांनी सांगितले. ‘देशातील ही एक वेगळ्या प्रकारची घटना आहे. नागरिकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, खिल्जी याच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शंभर मुलांनी वाटून घ्यावी, एवढी त्याची संपत्तीही नाही. त्यामुळे हा गंभीर विषय वाटत आहे