दहीहंडी
डोंबिवलीत बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठानची अध्यामिक दहीहंडी
डोंबिवली :- दि. २३ ( प्रतिनिधी) डोंबिवलीजवळील आजदेगावातील दत्तमंदिर चौकात वैकुंठवासी ह.भ.प. बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे यंदाही अध्यामिक दहीहंडी लावण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रतिष्ठानने अध्यक्ष वासुदेव पाटील म्हणाले , जिकडे तिकडे राजकीय छाप असलेल्या दहीहंड्या बांधल्या जातात. मात्र सामाजिक जाणीवेबरोबर अध्यामिक विचारांचा पगडा असलेल्या दहीहंडी उभारण्याचा आमचा उद्देश आहे. यावर्षी २ लाख २२ हजार २२२ रुपये अशी बक्षिसाची रक्कम आहे. यावर्षी आजदे गावातील यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील १ ली ते ७ वी इयत्तेतील उत्तीर्ण झालेल्या २१ विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. बुधाजी पाटील , मदन भोईर , जितेश पाटील , विशाल पाटील , अरविंद काळण, वरूण पाटील , अमित म्हात्रे , तुषार मालवणकर , शामू पेतेकर यांसह अनेकांचे सहकार्य लाभते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा