बेकायदा प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील ९ सप्टेंबर २00९ नंतरची अतिक्रमण करून बांधलेली सर्व बेकायदा प्रार्थनास्थळे तत्काळ हटविण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश एका प्रकरणात सहा वर्षांपूर्वी दिलेले असताना त्याची अंमलबजावणी न झाल्याने 'सोसायटी फॉर फास्ट जस्टिस' या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नगरविकास विभागाने आता अतिक्रमणे हटविण्याचे फर्मान काढले आहे. ९ सप्टेंबर २00९ नंतरची देशभरातील सर्व धार्मिक अतिक्रमणे हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच्या अंमलबजावणीचा आदेश काढण्यास राज्याच्या गृह विभागाने जवळपास दोन वर्षे घेतली. ५ मे २0११ रोजी ही अतिक्रमणे हटविण्याचा आदेश निघाला. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात येतील, असेही आदेशात म्हटले होते; पण ते सगळे कागदावरच राहिले. राज्यातील एकही बेकायदा प्रार्थनास्थळ या आदेशानुसार हटले नाही...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे मंत्री काम करत आहेत: रविंद्र चव्हाण
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे मंत्री काम करत आहेत: रविंद्र चव्हाण कल्याण : लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें केंद्र व राज्यातील भाजपचे मंत्री लोकहिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वमधील एका कार्यक्रमात केले. भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील आयोजित कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदीर शाळेत दोन दिवसीय शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उदघाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रदर्शन आयोजक संजय मोरे, संतोष पाटील तसेच शस्र संग्रहित करणारे सुनील कदम यांचे कौतुक करत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की शस्त्र प्रदर्शन पाहून आनंद झाला, यातून एकच सिद्ध होते की शिवाजी महाराज यांनी केलेली प्रत्येक लढाई महत्त्वपूर्ण होती आणि वेळेनुसार त्यांनी आणि त्यांच्या...
नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक
धक्कादायक घटना नवजात बालिकेला फेकून खून करणाऱ्या आईला अटक डोंबिवली :- दि. १२ ( प्रतिनिधी ) डोंबिवलीत १२ मार्च रोजी सकाळी पूर्वेकडील फतेह अली रोडला असलेल्या एका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून नवजात बालिकेला फेकून तिचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तब्बल एका महिन्यांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. दुसरी मुलगी झाली म्हणून घरी जाच होत असल्याने तिने ५ दिवसांच्या मुलीलाएका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची कबुली दिली असल्याची माहिती वपोनी सुनील शिवलकर यांनी सांगितले. सुजाता दत्ता गायकवाड ( २४ ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे . डोंबिवली पूर्वेत महापालीकेच्या कार्यालयासमोरील फतेह अली रोडला शुभदा नर्सिंग होम नामक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये अंबरनाथ तालुक्याच्या नाऱ्हेण गावात राहणारी सुजाता दत्ता गायकवाड ( २४ ) या महिलेने रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सिझेरियन प्रसूती नंतर मुलीस जन्म दिला. तेव्हा पासून हि महिला आपल्या मुलीसह हॉस्पिटल मध्ये होती. गुरुवारी सकाळी अंघोळ घालू...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा