सुभाष म्हस्के नवे सभापती

सुभाष म्हस्के नवे सभापती



कल्याण : कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) सभापती पदाचा पदभार भाजपाचे सुभाष म्हस्के यांनी स्विकारला,  सध्या केडीएमटी अनेक अडचणींमधून जात असून त्यासाठी कर्मचारी, अधिकारी, पालिका पदाधिकारी, परिवहन समिती सदस्य यांना सर्वाना एकत्र घेऊन कामकाज करण्याचा मानस यावेळी म्हस्के यांनी व्यक्त केला. 
कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून दोन्ही पक्षाने सभापती पद एक एक वर्ष वाटून घेतले असून त्यानुसार सभापती पदाचा पदभार सुभाष म्हस्के यांनी स्वीकारला. यावेळी पालिका उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक सुरेश पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती राहुल दामले, भाजपा गटनेते वरूण पाटील, परिवहन समिती सदस्य संजय पावशे, संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, तसेच कल्याण पूर्व मधील भाजपा पदाधिकारी संदीप तांबे, उद्योजक रवी हराळे आदींनी शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे नवनिर्वाचित सभापती सुभाष म्हस्के यांचा वाढदिवस होता तो त्यांनी आगळा वेगळा साजरा केला. म्हस्के म्हणाले की, नवीन काही काम करू शकणार नाही कारण सध्या केडीएमटी अनेक अडचणी मधून जात असून ही समस्या दूर करण्यासाठी सर्वांची मदत घेतली जाईल. कर्मचारी वर्गाचा वेळेवर पगार होणे, उपन्न वाढ, नागरीकांना बससेवा यावर लक्ष देणार असून पालिका, राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता असल्याने नवीन योजना आणण्याचा प्रयन्त करणार असल्याचे मत यावेळी सभापती सुभाष म्हस्के यांनी व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत